कार शेअरिंग मार्केटप्लेस झूमकारने गुरुवारी एक भन्नाट ऑफर लाँच केली आहे. याद्वारे खासगी कार मालक त्यांची कार काही दिवसांसाठी भाड्याने देऊन पैसे कमवू शकणार आहेत. याद्वारे वाहन मालकांना मोठा फायदा होणार आहे, शिवाय कर्जाच्या हप्त्यांचे टेन्शनही दूर होणार आहे. झूमकार मुंबई, पुण्यासह अनेक शहरांमध्ये ही सेवा सुरु करणार आहे.
झूमकार सध्या 8 शहरांमध्ये आधीपासूनच 5000 हून अधिक कारच्या मदतीने अशी सेवा देत आहे. कंपनी पुढील 12 महिन्यांत 50000 हून अधिक कार आणि 100 शहरांत हा प्लॅटफॉर्म विकसित करण्याची तयारी करत आहे.
झूमकारचे सीईओ आणि सह संस्थापक ग्रेग मोरन यांनी म्हटले की, झूमकारमध्ये आमचे उद्दीष्ट जगभरातील हाय डेव्हलपमेंटच्या शहरांमध्ये कार अॅक्सेसला सोपे बनविणे आहे. भारत येणाऱ्या काळात देखील आमच्यासाठी मोठा बाजार असेल. आमचा नवीन होस्ट प्रोग्रॅम सर्व आव्हानांना झेलण्यासाठी स्थानिक उपाय तयार करण्याची आमची इच्छा भारतात अर्बन मोबिलिटीसाठी खूप चांगली आहे.
या नवीन प्रोग्रॅमनुसार कार मालक त्यांच्या सोईनुसार त्यांची कार झूमकारसोबत शेअर करू शकतात. समजा तुम्ही आठवड्यासाठी कुठेही जाणार नसाल तर तुमची कार पार्किंगमध्ये उभी न ठेवता झूमकारला देवून पैसे कमावू शकता. सर्वात चांगली बाब म्हणजे झूमकार थेट वाहन मालकाच्या बँक अकाऊंटमध्ये ताबडतोब पैसे पाठविते.
या प्रोग्रॅमनुसार जे वाहन मालक झूमकारसोबत जातील त्यांना 10000 रुपयांचा बोनस मिळणार आहे. तसेच सुरुवातीला लेटेस्ट इंसेंटिव्ह देखील ऑफर करत आहे.