नवी दिल्ली, दि. 4 : लंडन आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिने पुन्हा गोपीचंद सरांकडे परतण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातील लक्ष्यप्राप्तीकरिता हा निर्णय घेत असल्याचे तिने आज टिष्ट्वट केले.सायना म्हणाली, ब-याच दिवसांपासून मी माझ्या ट्रेनिंगबाबत विचार करीत होती. यासंदर्भात गोपीचंद सरांसोबतही चर्चा केली आणि त्यांनी मला परवानगी दिली. मी त्यांची खूप आभारी आहे.
करिअरच्या या टप्प्यात माझे लक्ष्य प्राप्त करण्यासाठी ते मदत करू शकतील, याचा मला विश्वास आहे. २७ वर्षीय चॅम्पियन सायनाने इंचियोन २०१४ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी राष्ट्रीय प्रशिक्षक गोपीचंद यांच्यापासून वेगळे होणे आणि बंगळुरु येथे विमल कुमार यांच्या मार्गदर्शनखाली खेळण्याचा निर्णय घेतला होता.
सायनाने लिहिले की, मी विमल सरांचीही खूप आभारी आहे. ज्यांनी गेल्या तीन वर्षांपासून माझी मदत केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी विश्वात नंबर वन मानांकन प्राप्त करू शकले. याबरोबरच जागतिक स्पर्धेत दोन पदक, २०१५ मध्ये रौप्य आणि २०१७ मध्ये कांस्यपदक मिळवू शकले. आपल्या घरी म्हणजे हैदराबाद येथे परतल्याने सायना खूप आनंदी आहे. तिने आपल्या मित्रांनी दिलेल्या प्रोत्साहानाबद्दलही धन्यवाद दिले.२०१४ मध्ये डेनमार्क येथे झालेल्या विश्व चॅम्पियनशीपच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर सायनाने गोपीचंद यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.
साईनाने सोडली होती गोपचंद यांची अकॅडमीचायनीज खेळाडू ली जुरई आणि अन्य काही चायनीज खेळाडूंविरुद्ध होणाऱ्या सलग पराभव आणि कामगिरी उंचावत नसल्याचे कारण देत तिने गोपीचंद यांच्या अकॅडमीमधून बाहेर येण्याचा निर्णय घेतला. यानंतर तिने विमल कुमार यांना प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. विमल कुमार यांच्या प्रशिक्षणात ती जागतीक मानांकनात पहिल्या क्रमांकावर पोहचली होती.