फुलरटन (अमेरिका) : भारतीय बॅडमिंटन खेळाडू अजय जयराम याला १५०,००० डॉलर बक्षीस रकमेच्या यूएस ओपन बीडब्ल्यूएफ विश्व टूर सुपर ३०० स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नेदरलँडच्या मार्क कालजोऊ याच्याविरुद्ध सरळ गेम्समध्ये पराभवाचे तोंड पाहावे लागले. ३० वर्षीय भारतीय खेळाडूला पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत सहाव्या मानांकित मार्ककडून ३६ मिनिटांत १३-२१, २१-२३ असा पराभव पत्करावा लागला. जयरामला गेल्या वर्षी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेदरम्यान दुखापग्रस्त झाला होता. त्यामुळे तो विश्व रँकिंगमध्ये १३४व्या स्थानी घसरला. (वृत्तसंस्था)
अजय जयराम पराभूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 3:46 AM