एनिग (चीन) : भारताची एकेरीतील आघाडीची महिला टेनिसपटू अंकिता रैना हिने कुनपिग टेनिस ओपनमध्ये बुधवारी धक्कादायक विजयाची नोंद करीत माजी अमेरिकन ओपन चॅम्पियन सामंता स्टोसूर हिचा पराभव केला. कारकिर्दीमधील या सर्वात मोठ्या विजयासह अंकिताने स्पर्धेची दुसरी फेरीदेखील गाठली आहे.आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्य विजेती असलेल्या अंकिताने डब्ल्यूटीए १२५ के स्पर्धेत दोन तास ५० मिनिटे रंगलेल्या सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या स्टोसूरविरुद्ध ७-५, २-६, ६-५ अशा गुणफरकाने विजय संपादन केला. उभय खेळाडू केवळ दुसऱ्यांदा एकमेकांविरुद्ध खेळत होत्या. स्टोसूरने मागचा सामना सरळ सेटमध्ये जिंकला होता. २६ वर्षांच्या अंकिताला स्टोसूरविरुद्ध खेळताना बºयाच समस्यांना तोंड द्यावे लागले. संपूर्ण लढतीदरम्यान स्टोसूरच्या तुलनेत ती केवळ तीन एस नोंदवू शकली. स्टोसूरने सात एसची नोंद केली. तथापि, जागतिक क्रमवारीत ७७ व्या स्थानावर असलेल्या स्टोसूरने अंकिताच्या(सहा) तुलनेत एकूण १८ डबल फॉल्ट केले.आता या धक्कादायक विजयानंतर अंकिता स्पर्धेच्या दुसºया फेरीत चीनची काय लिन झांग हिच्याविरुद्ध खेळेल. जागतिक महिला क्रमवारीत १७८ व्या स्थानी असलेल्या अंकिताने या महिन्याच्या सुरुवातीला इस्तंबूलमधील आयटीएफ स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. गतवर्षी ती सानिया मिर्झा आणि निरुपमा वैद्यनाथन यांच्यानंतर महिला एकेरीत अव्वल २०० खेळाडूंत स्थान पटकविणारी केवळ तिसरी भारतीय टेनिसपटृ बनली होती. (वृत्तसंस्था)
अंकिता रैनाचा स्टोसूरला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 3:23 AM