जकार्ता - फुलराणी सायना नेहवालने भारताला पुन्हा एकदा अविस्मरणीय क्षण अनुभवायची संधी दिल्ली. दुःख इतकेच की सायनाला कांस्यपदकाची वेस ओलांडता आली नाही. 1982 नंतर आशियाई स्पर्धेत भारताला बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीतील पहिले पदक जिंकून देण्याचा मान सायनाने पटकावला. उपांत्य फेरीत जागतिक क्रमावारीत अव्वल असलेल्या चायनीज तैपेईच्या ताय त्झुंयिंगकडून सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. मात्र सायनाने तैपेईच्या खेळाडूला कडवी झुंज दिली.
# सायना आणि त्झुयिंग यांनी बहारदार खेळ केला. पहिला गेम गमावूनही सायनाने कडवी झुंज दिली.
# दुसऱ्या गेममध्ये 11-11 अशी बरोबरी
#त्झुयिंगविरूद्ध सायनाची जय-पराजयाची आकडेवारी 11-5 अशी आहे.
#सायना नेहवालला पहिल्या गेममध्ये 17-21 असा पराभव पत्करावा लागला
जकार्ता - भारताला 1982 नंतर बॅडमिंटनचे एकेरीतील पदक निश्चित करणाऱ्या सायना नेहवाच्या उपांत्य फेरीच्या लढतीला सुरूवात झाली आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या चायनीज तैपेईच्या ताय त्झू यिंगचा सामना करावा लागणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीसाठी सायना आणि पी. व्ही. सिंधू यांच्यासाठी शुभेच्छांचे संदेश सोशल मीडियावर दिले जात आहेत.