शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिप : भारताची नजर सुवर्णपदकावर, श्रीकांत, सिंधूकडून चमकदार कामगिरीची आशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 1:36 AM

फॉर्मात असलेला किदाम्बी श्रीकांत आणि दोनदा कांस्यपदकाची मानकरी ठरलेली पी. व्ही. सिंधू सोमवारपासून प्रारंभ होणाºया बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये २१ सदस्यांचा समावेश असलेल्या भारतीय पथकाचे नेतृत्व करणार आहेत. या स्पर्धेत भारताची नजर सुवर्णपदकावर केंद्रित झाली आहे.

ग्लास्गो : फॉर्मात असलेला किदाम्बी श्रीकांत आणि दोनदा कांस्यपदकाची मानकरी ठरलेली पी. व्ही. सिंधू सोमवारपासून प्रारंभ होणाºया बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये २१ सदस्यांचा समावेश असलेल्या भारतीय पथकाचे नेतृत्व करणार आहेत. या स्पर्धेत भारताची नजर सुवर्णपदकावर केंद्रित झाली आहे.इंडोनेशिया व आॅस्ट्रेलियामध्ये सलग जेतेपद पटकावल्यानंतर श्रीकांत कामगिरीत सातत्य राखत विश्व चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक पहिले पदक पटकावण्यास उत्सुक आहे.सलग तीन स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी केल्यानंतर श्रीकांत येथे दाखल झाला आहे, तर सिंधू यंदा गेल्या सुपर सिरीज स्पर्धांमध्ये दोनदा उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी ठरली आहे.सिंधूला दुसºया फेरीत कोरियाची किम हयो मिन व मिस्रची हादिया होस्री यांच्यादरम्यानच्या लढतीतील विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सिंधू उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यशस्वी ठरली तर तेथे तिची गाठ चीनच्या सुन यूसोबत पडण्याची शक्यता आहे.सायनाला स्वित्झर्लंडची सबरिना जाकेट व युक्रेनची नटाल्या वोयेतसेख यांच्यातील विजेत्या खेळाडूसोबत खेळावे लागेल. उपउपांत्यपूर्व गाठल्यास सायनाला दुसºया मानांकित कोरियाच्या सुंग जी हुनच्या आव्हानाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. स्पर्धेपूर्वी भारतीय खेळाडूंनी मात्र यंदाच्या मोसमात वर्चस्व गाजविले आहे. त्यांनी सहा स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावले आहे. त्यात १५ व्या मानांकित बी. साई प्रणितने सिंगापूरमध्ये प्रथमच सुपर सिरीज जेतेपद पटकावले, तर समीर वर्माने लखनौमध्ये सय्यद मोदी ग्रांप्री गोल्ड स्पर्धेत विजेतेपद पटकावले. थायलंड ग्रांप्री गोल्ड स्पर्धा जिंकणाºया प्रणितला पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या वेई नामच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल, तर अजय जयरामची पहिल्या फेरीत गाठ आॅस्ट्रियाच्या लुका रॅबरसोबत पडणार आहे.श्रीकांतची लढत रशियाच्या सरगे सिरांतसोबत होईल. श्रीकांत अ‍ॅन्ड कंपनीला स्टार खेळाडूंच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. स्टार खेळाडूंमध्ये दोनदा जेतेपद पटकावणारा आॅलिम्पिक चॅम्पियन चेन लोंग, जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला सोन वान, अनुभवी ली चोंग वेई, डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सेलसन, चीनचा शी युकी व पाच वेळचा विश्वचॅम्पियन लीन डॅन आदींचा समावेश आहे.महिला एकेरीमध्ये राष्ट्रीय चॅम्पियन रितूपर्णा दासला पहिल्या फेरीत एरी मिकेला, तर तन्वी लाडला इंग्लंडच्या चोले बर्चच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली ताई जु यिंग या स्पर्धेत सहभागी झालेली नाही. त्यामुळे तिसरे मानांकन प्राप्त व दोनदा जेतेपदाचा मान मिळवणाºया कॅरोलिना मरिनचे भारतीय खेळाडू सायना व सिंधू यांच्यापुढे कडवे आव्हान राहील. भारतीय खेळाडूंना जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानावर असलेली जपानची यामागुची व तिसºया क्रमांकावरील दक्षिण कोरियाची सुंग जी यून यांच्यापासूनही सावधगिरी बाळगावी लागेल. (वृत्तसंस्था)आॅलिम्पिक रौप्यपदकविजेत्या सिंधूने २०१६ चायना ओपन व २०१७ इंडिया ओपन या स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावले आहे. २०१३ व २०१४ मध्ये विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदकाची मानकरी ठरलेली सिंधू या वेळी पदकाचा रंग बदलण्यासाठी प्रयत्नशील आहे.- पी. व्ही. सिंधूमी खरंच चांगला खेळत असून आत्मविश्वास उंचावलेला आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत सहभागी होताना प्रत्येक खेळाडूचा फिटनेस दर्जेदार असतो. त्यामुळे मी आताच अंतिम फेरी गाठण्याबाबत विचार करीत नाही, पण माझे लक्ष पहिल्या फेरीच्या लढतीवर केंद्रित झाले आहे.- श्रीकांत