देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना संबोधित करताना आत्मनिर्भरतेचा नारा दिला होता. त्यांच्या या आवाहनानंतर चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची चर्चा सुरू झाली. थ्री इडियट फेम सोनम वांगचुक यांनीही सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड करून चीनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं होतं. पण, हे आवाहन आता वर्णद्वेषीय रंग घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टावर एका नेटिझन्सनं विषारी टीका केली. त्यानं चीनी वस्तूंसह ज्वाला गुट्टावर बहिष्कार घाला अशी कमेंट केली.
चाहत्यांना येतेय युवराज सिंगची आठवण, सोशल मीडियावर ट्रेंड होतंय #MissYouYuvi!
तिनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. त्याखाली ज्वाला गुट्टावर बहिष्कार घाला अशी कमेंट केली होती. ज्वालानं त्याचा स्क्रिनशॉट ट्विटरवर शेअर केला. अर्जुन पुरस्कार विजेत्या ज्वालानं लिहिलं की,''आपली वाटचाल या दिशेनं चालली आहे.'' दरम्यान, ज्वाला गुट्टाला अनेकांनी पाठींबा दिला.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
महेंद्रसिंग धोनीनं दिलं पक्ष्याला जीवदान; कन्येनं सांगितली संपूर्ण हकिकत!
पाकिस्ताननं 'आशिया चषक' आयोजनाचा हट्ट सोडला; या देशात होणार यंदाची स्पर्धा!
दिल्ली सरकार पहिल्या दिवसापासून खोटं बोलतंंय; खासदार गौतम गंभीरचा 'स्ट्रेट ड्राईव्ह'
शोएब अख्तरनं निवडले टॉप 10: भारत-पाकिस्तान ऑल टाईम खेळाडूंमध्ये धोनी, गांगुली यांना स्थान नाही
बाबो; ऐतिहासिक विजयाच्या आनंदात 'तिनं' केलं न्यूड फोटोशूट; सोशल मीडियावर धुमाकूळ