भारताची फुलराणी सायना नेहवाल आज भारतीय जनता पार्टीची सदस्य होणार आहे. आज त्याची अधिकृत घोषणा होणार असल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. मागील काही महिन्यांपासून सायनाला आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू होते आणि अखेरीस त्यांना यश मिळाल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बबिता फोगाट यांनी हरयाणा विधानसभा आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर याने भाजपाच्या चिन्हावर लोकसभा निडवणुक लढवली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीत सायनाही निवडणुकीच्या रिंगणात दिसण्याची शक्यता आहे.
सायनानं आतापर्यंत 24 आंतरराष्ट्रीय जेतेपदं पटकावली आहेत. तिनं तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आणि 2012च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिनं कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला. BWFच्या बहुतांश स्पर्धांमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारी ती एकमेव भारतीय बॅडमिंटनपटू आहे. तिनं BWF वर्ल्ड चॅम्पियनशीप, BWF वर्ल्ड ज्युनियर अजिंक्यपद स्पर्धेत तिच्या नावावर पदकं आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटनपटू आहे. शिवाय वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या पहिल्या भारतीय बॅडमिंटनपटूचा मानही सायनाच्या नावावर आहे. राष्ट्रकुल स्पर्धेत ( 2010 आणि 2018) दोन सुवर्णपदक नावावर असणारी ती पहिलीच भारतीय आहे. 2016मध्ये तिला पद्म भुषण पुरस्कारानं गौरविण्यात आलं. त्यानंतर तिला राजीव गांधी खेल रत्न आणि अर्जुन पुरस्कारही देण्यात आला.
सायनाची पदकं2012 ऑलिम्पिक - कांस्यपदकवर्ल्ड चॅम्पियनशीप - रौप्यपदक ( 2015) आणि कांस्यपदक ( 2017)उबेर चषक - कांस्यपदक ( महिला संघ) 2014 व 2016राष्ट्रकुल स्पर्धा - सुवर्णपदक ( महिला एकेरी) 2010 व 2018; सुवर्णपदक ( मिश्र संघ) 2018, रौप्यपदक ( मिश्र संघ) 2010, कांस्यपदक ( मिश्र संघ) 2006.आशियाई स्पर्धा - कांस्यपदक ( महिला सांघिक 2014 व महिला एकेरी 2018)आशियाई अजिंक्यपद - कांस्यपदक ( 2010, 2016, 2018)वर्ल्ड ज्युनियर अजिंक्यपद - सुवर्णपदक ( 2008), रौप्यपदक ( 2006)राष्ट्रकुल युवा स्पर्धा - सुवर्णपदक ( 2008), रौप्यपदक ( 2004, मिश्र संघ)