स्वित्झर्लंड, जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या पी. व्ही. सिंधूने अखेरीस अंतिम फेरीतील अपयश मागे सोडून जेतेपदाला गवसणी घातली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या सिंधूने यावेळी जेतेपदाचा दुष्काळ संपवला. तिने जपानच्या नोझोमी ओकुहाराला नमवून सुवर्णपदक नावावर केले. सिंधूनं हा सामना 21-7, 21-7 असा जिंकला. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्मपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.
या सामन्याचे हायलाईट्स
आईला बर्थ डे गिफ्टसामन्यानंतर सिंधू म्हणाली,'' या क्षणाची मी आतुरतेनं वाट पाहत होती. हा विजय माझ्यासाठी खास आहे. आजच्याच दिवशी हा विजय मिळवल्यानं आनंद द्विगुणित झाला आहे. कारण आज माझ्या आईचा वाढदिवस आहे. ही तिला माझ्याकडून मिळालेली आतापर्यंतची सर्वोत्तम भेट असेल.''
ती पुढे म्हणाली, ''या विजयाची मी प्रदीर्घ काळापासून प्रतीक्षा करत होते. अखेरीस मी वर्ल्ड चॅम्पियन झाले. ही अंतिम लढत आहे असे मी डोक्यात ठेवले नाही. माझे संपूर्ण लक्ष या सामन्यावर होते. अन्य लढतीप्रमाणे मी हा सामना खेळले. त्यामुळे कोणतेही दडपण आले नाही. बऱ्याच काळापासून मी या दिवसाची वाट पाहत होते.''
अभिनंदनाचा वर्षाव