नवी दिल्ली : स्टार खेळाडूंसह सेल्फी किंवा फोटो काढून घेण्यास अनेकांमध्ये चढाओढ रंगलेली असते. परंतु, जागतिक स्पर्धेदरम्यान पी. व्ही. सिंधूची आई आणि सायना नेहवालचे वडील एका अनपेक्षित चाहत्याला पाहून अचंबित झाले. कारण, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून खुद्द आॅलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिन मरिनची आई टोनी मार्टिन होती.सिंधू आणि सायना यांची एक झलक पाहण्यासाठी मार्टिन या भारतीय चाहत्यांसह ‘फॅन झोन’ बाहेर उभ्या होत्या. त्यांनी सर्वप्रथम सिंधू आणि सायनासह सेल्फी घेतल्यानंतर सायनाचे वडील हरवीर नेहवाल आणि सिंधूची आई पी. विजयालक्ष्मी यांच्यासहदेखील फोटो काढले. दरम्यान, कोर्टवर सायना-सिंधू यांची कट्टर प्रतिस्पर्धी असलेली कॅरोलिन, कोर्टबाहेर मात्र तितकीच चांगली मैत्रीणदेखील आहे. २०१५च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कॅरोलिनाने सायनाला पराभूत केले होते.
सिंधूच्या आईच्या प्रतीक्षेत राहिली कॅरोलिनाची आई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 4:14 AM