नवी दिल्ली : प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत भारताने युवा खेळाडूंना संधी दिली आहे. मात्र विश्व रँकिंगमध्ये १८ व्या स्थानावर असलेल्या बी. साई प्रणीत याला वाटते की भारत या स्पर्धेत पदकाचा दावेदार आहे.भारतीय संघ गेल्या तीन स्पर्धांत बाद फेरीत पोहचण्यात अपयशी ठरला आहे. २०१० मध्ये अखेरच्या वेळी भारताने बाद फेरी गाठली होती.रविवारपासून बँकॉकमध्ये सुरू होणाºया या स्पर्धेत भारत शानदार खेळ करेल, अशी आशा साई प्रणीत याने व्यक्त केली. तो म्हणाला, ‘सामना कठीण आहे. सर्व संघ मजबूत आहेत. आमचा युवा संघ आहे आणि आम्ही पदक घेऊनच परत येऊ.’ भारताला या स्पर्धेत ग्रुप ए मध्ये आॅस्ट्रेलिया, फ्रान्स आणि चीन सोबत स्थान मिळाले आहे. या संघात प्रणय, समीर वर्मा, युवा खेळाडू लक्ष्य सेन, दुहेरीत मनु अत्री, बी सुमित रेड्डी, अर्जुन एम.आर. आणि रामचंद्रन श्लोक यांचा समावेश आहे.
थॉमस चषकात पदकाचे दावेदार -प्रणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:06 AM