क्वालालम्पूर : प्रणव जेरी चोपडा व एन. सिक्की रेड्डी या भारताच्या मिश्र दुहेरीतील जोडीला मोसमाच्या पहिल्या मलेशियाचा मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नाही. सिक्की व प्रणव यांना ली चुुन हेई रेगीनाल्ड व चाऊ होऊ वाहतो या सातव्या मानांकित हाँगकाँगच्या जोडीविरुद्ध १८-२१, १७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला.भारताची प्राजक्ता सावंत व मलेशियाचा योगेंद्रन कृष्णन जोडीने मात्र मिश्र दुहेरीत दुसरी फेरी गाठली. या जोडीला सवान सेरासिंघे व सेत्याना मपासा या आॅस्ट्रेलियन जोडीविरुद्ध पुढे चाल मिळाली. पुरुष एकेरीत पात्रता फेरीचा अडथळा पार करणाºया पी. कश्यपला थायलंडच्या कंताफोन वांगचारियोनविरुद्ध १४-२१, १७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला, तर शुभंकर डे डेन्मार्कच्या किम ब्रूनविरुद्ध २१-११, ११-२१, ९-२१ ने पराभूत झाला. महिला दुहेरीत क्वालिफायर अपर्णा बालन व श्रुती केपी यांना ओंग रे नी व वोंग जिया यिंग क्रिस्टल या सिंगापूरच्या जोडीविरुद्ध १२-२१, २१-१८, १५-२१ ने पराभव स्वीकारावा लागला; तर संयोगिता घोरपडे व प्राजक्ता जोडीला मलेशियाच्याच्यू सिएन लिम व झेन याप या जोडीविरुद्ध२०-२२, १८-२१ ने पराभव पत्करावा लागला.
भारतीय बॅडमिंटनपटूंची निराशाजनक सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 3:08 AM