टोकियो : किदाम्बी श्रीकांत आणि एचएस प्रणॉय या भारताच्या आघाडीच्या बॅडमिंटनपटूंचे जपान ओपन सुपर सिरिज स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्याचवेळी, मिश्र गटात प्रणव जेरी चोप्रा - एन. सिक्की रेड्डी या जोडीने शानदार कामगिरी करताना उपांत्य फेरीत धडक मारली आहे.याआधीच महिला एकेरीमध्ये पी. व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीयांच्या सर्व आशा श्रीकांत व प्रणॉय यांच्यावर होत्या. मात्र, पुरुष गटातही उपांत्यपूर्व फेरीतच भारताच्या पदरी निराशा आली. यंदाच्या वर्षी इंडोनेशिया आणि आॅस्टेÑलिया ओपन जेतेपद पटकावलेल्या श्रीकांतला जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेला वर्ल्ड चॅम्पियन व्हिक्टर अॅक्सेलसनविरुद्ध पराभव पत्करावा लागला. सुमारे ४० मिनिटांपर्यंत रंगलेल्या या सामन्यात श्रीकांतला सरळ दोन गेममध्ये १७-२१, १७-२१ अशा पराभवास सामोरे जावे लागले. या शानदार विजयासह अॅलेक्सनने श्रीकांतविरुद्धचा आपला रेकॉर्ड ३-२ असा केला.संपुर्ण सामन्यात श्रीकांतने अनेक चुका केल्या. गुण मिळवण्याच्या सोप्या संधी गमावल्याचा मोठा फटका त्याला बसला. त्याचवेळी, अॅलेक्सनने आक्रमक पवित्रा घेताना जबरदस्त स्मॅशचा हल्ला करताना श्रीकांतला दबावाखाली ठेवले. अॅलेक्सनने मोठी आघाडी घेतल्यानंतर श्रीकांतने शानदार पुनरागमनही केले. परंतु, ऐनवेळी झालेल्या चुकांमुळे त्याला स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला.मिश्र दुहेरी गटात प्रणव - रेड्डी यांनी भारतासाठी शानदार कामगिरी केली. प्रणव - रेड्डी यांनी तीन गेमपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात बाजी मारताना कोरियाच्या सियुंग जाए सो आणि किम हा ना यांचे कडवे आव्हान २१-१९, ९-२१, २१-१९ असे परतावले. उपांत्य सामन्यात भारतीय जोडीपुढे जपानच्या ताकुरो होकी - सायाका हिरोता यांचे तगडे आव्हान असेल. (वृत्तसंस्था)>युकीचा धडाकाअमेरिकन ओपन चॅम्पियन एच. एस. प्रणॉयचा चीनच्या द्वितीय मानांकीत शी युकी याच्याविरुध्द ४५ मिनिटांपर्यंत रंगलेल्या सामन्यात १५-२१, १४-२१ असा पराभव झाला.>निर्णायक क्षणी चुकाउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत श्रीकांत लौकिकानुसार खेळ करण्यात सपशेल अपयशी ठरला. पहिल्या गेममध्ये पुनरागमन करत चांगला खेळ दाखवल्यानंतर दुसºया गेममध्ये चुका मोक्याच्यावेळी त्याच्याकडून चुका झाल्या. श्रीकांतच्या चुकांचा अचूक फायदा अॅक्सेलसनने घेतला.
श्रीकांतचे आव्हान संपुष्टात, प्रणव जेरी - चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी उपांत्य फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 3:58 AM