नवी दिल्ली, दि. 15 - स्कॉटलंडच्या ग्लासगो शहरात रंगणाऱ्या आगामी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय संघ 17 तारखेला रवाना होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला दुहेरीतील एन.सिकी रेड्डीचा व्हिसा अद्याप आलेला नाही. 21 ते 27 ऑगस्ट दरम्यान रंगणाऱ्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत तिची जोडी आश्विनी पुनप्पासोबत आहे. आश्विनी पुनप्पाचा व्हिसा कालच आला पण तिचा अद्याप आला नाही, त्यामुळे सिकी रेड्डी चिंतेत आहे. मदतीसाठी सिकी रेड्डीने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराजकडे मदतीची धाव घेतली आहे.सिकी रेड्डीनं ट्विट करत व्हिसा मिळण्याबद्दल सुषमा स्वराज, विजय गोयल यांना विनंती केली आहे. सध्या जागतिक बॅडमिंटन मानांकनात सिकी रेड्डी 20 व्या स्थानावर आहे. आपल्या बॅडमिंटन करियरमध्ये तिनं आतापर्यंत 13 व्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. साऊथ एशियन गेम्समध्ये सिकी रेड्डीनं भारताचं प्रतिनिधित्व करताना गोल्ड मेडल पटकावलं आहे. तसेच 2016 मध्ये ब्राझील रशियामध्ये झालेल्या स्पर्धेतही तिनं गोल्ड मेडल पटकावलं आहे. आश्विनी पुनप्पा आणि सिकी रेड्डीने व्हिसासाठी एकाच दिवशी अर्ज दाखल केला होता. 17 तारखेला भारतीय संघ स्कॉटलंडसाठी रवाना होत आहे. सिकी रेड्डीचा व्हिसा अद्याप न आल्यामुळे भारतीय संघासोबत ती जाऊ शकणार नाही. भारतीय बॅडमिंटन असोसिएशनच्या मते सिकी रेड्डीनं व्हिसासाठी उशीरा अर्ज दाखल केला होता. तिला व्हिसा लवकरच मिळेल.
या स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघावर एक नजर पुरुष एकेरी - श्रीकांत किदम्बी, अजय जयराम, बी.साई प्रणीत, समीर वर्मामहिला एकेरी - पी.व्ही.सिंधू, सायना नेहवाल, रितुपर्ण दास, तन्वी लाडपुरुष दुहेरी - मनु अत्री आणि सुमित रेड्डी, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी, श्लोक रामचंद्रन आणि एम.आर.अर्जुनमहिला दुहेरी - आश्विनी पुनप्पा आणि एन.सिकी रेड्डी, संजना संतोष आणि आर्थी सारा सुनील, मेघना जक्कमपुडी आणि पुर्विशा एस.राममिश्र दुहेरी- प्रणव चोप्रा आणि एन.सिकी रेड्डी, बी. सुमित रेड्डी आणि आश्विनी पुनप्पा, सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि के. मनिषा