नानजिंग (चीन) : भारताच्यासायना नेहवालने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. पण या सामन्याच्या दुसऱ्या गेममध्ये थायलंडच्या रॅटचानोक इन्टॅनॉनने जोरदार पुनरागमन केले. तिने सायनाशी 19-19 अशी बरोबरी केली. त्यावेळी काय करावे ह सायनाला कळत नव्हते. त्यावेळी भारताचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी सायनाला कठिण परिस्थितून बाहेर काढले. ही बाब दस्तुरखुद्द सायनानेच सामन्यानंतर सांगितली.
जागितक स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत सायनाने उपउपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या रॅटचानोक इन्टॅनॉनला 21-16, 21-19 असे पराभूत केले. या सामन्यातील पहिला गेम सायनाने सहजपणे जिंकला. पण दुसऱ्या गेममध्ये मात्र तिला रॅटचानोकने कडवी झुंज दिली. मोक्याच्या क्षणी रॅटचानोकने आपला खेळ उंचावला. त्यावेळी रॅटचानोकला कसे रोखावे, हा सायनाला कळत नव्हते. त्यावेळी तिला मोलाचे मार्गदर्शन गोपीचंद यांनी केले आणि सायनाला सामना जिंकता आला.
सायना म्हणाली की, " सामन्याच्या दुसऱ्या गेममध्ये मी 18-14 अशी आघाडीवर होते. त्यावेळी हा गेम मी सहज जिंकेल, असे वाटत होते. पण रॅटचानोकला आपण हा गमावणार, असे वाटायला लागले. त्यामुळे तिने बेधडकपणे खेळ करायला सुरुवात केली. त्यानंतर मला फक्त एकच गुण जिंकता आला, तर तिने तब्बल पाच गुण मिळवत माझ्याशी 19-19 अशी बरोबरी केली. त्यावेळी नेमके काय करायला हवे, हे मला सुच नव्हते. त्यावेळी गोपीचंद यांनी मला जो सल्ला दिला तोच विजयासाठी पोषक ठरला. त्यामुळे या विजयात त्यांचाही मोलाचा वाटा आहे."
काही दिवसांपूर्वी सायना आणि गोपीचंद यांच्यामध्ये विस्तवही जात नव्हता. सायनाने गोपीचंद यांच्याकडून बॅडमिंटनचे धडे गिरवले. पण त्यानंतर मला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायचे नाही, अशी भूमिका सायनाने घेतली होती. त्यानंतर सायना विमलकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत होती. पण कालांतराने सायना पुन्हा एकदा गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली खेळायला लागली आणि आता तर तिने त्यांची स्तुती करायला सुरुवात केली आहे.