हैदराबाद : विद्यमान राष्ट्रीय चॅम्पियन सौरभ वर्माने रविवारी येथे हैदराबाद ओपन बीडब्ल्यूएफ टूर सुपर १०० स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत सिंगापूरच्या लोह किन यियूचा पराभव करीत जेतेपदावर नाव कोरले. महिला दुहेरीच्या अंतिम लढतीत अश्विनी पोनप्पा व एन. सिक्की रेड्डी या भारतीय जोडीला पराभव स्वीकारावा लागला.यंदा मे महिन्यात स्लोवेनिया आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या मध्य प्रदेशच्या या २६ वर्षीय खेळाडूने शानदार कामगिरी करताना जागतिक क्रमवारीत ४४ व्या स्थानावर असलेल्या किन यियूचा ५२ मिनिट रंगलेल्या लढतीत २१-१३, १४-२१, २१-१६ ने पराभव केला.अश्विनी व सिक्की या अव्वल मानांकित महिला दुहेरीच्या जोडीला पहिले जेतेपद पटकावण्यात अपयश आले. भारतीय जोडीला बाएक हा ना व जंग क्यूंग युन या कोरियन जोडीविरुद्ध २१-१७, २१-१७ ने पराभव स्वीकारावा लागला.सौरभने चांगली सुरुवात करताना ६-२ आणि त्यानंतर ११-४ अशी आघाडी घेत पहिला गेम २१-१३ ने सहज जिंकला. दुसºया गेममध्येही भारतीय खेळाडूने ५-० अशी आघाडी घेतली होती, पण किन यियूने सुरुवातीला १०-१० अशी बरोबरी साधल्यानंतर १४-१३ अशी आघाडी घेतली.किनने त्यानंतर सलग पाच गुण घेत भारतीय खेळाडू सौरभ वर्माला गेममध्ये पुनरागमन करण्याची संधी दिली नाही.१-१ अशा बरोबरीने उभय खेळाडूंदरम्यान तिसºया गेममध्ये चुरस अनुभवाला मिळाली. ब्रेकदरम्यान सौरभने ११-१० अशी आघाडी घेतली होती. ब्रेकनंतर किन यियूला संधी न देता सौरभने २१-१६ ने गेम जिंंकत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.या अठवड्यात माझ्या खेळाने मी खुश आहे. गेल्या काही काळापासून मी संघर्षपुण४ विजय मिळवला. अंतिम सामन्यात देखील चांगला खेळ केला. पहिला गेम जिंकल्यानंतर दुसºया गेममध्ये देखील मी पुढे होतो. मात्र सामना लवकर संपवण्याच्या नादात माझे लक्ष भरकटले. तिसºया गेममध्ये रणनितीत बदल केल्याचा फायदा झाला. - सौरभ वर्मा
हैदराबाद ओपन बॅडमिंटन : सौरभ वर्माला जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 4:39 AM