नवी दिल्ली : गत चॅम्पियन पी. व्ही. सिंधू आणि माजी चॅम्पियन किदाम्बी श्रीकांत उद्यापासून (मंगळवार) पात्रता फेरीने सुरू होणाºया इंडिया ओपन २०१८ सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीत भारताच्या आव्हानाचे नेतृत्व करणार आहेत.सिंधूव्यतिरिक्त महिला एकेरीत माजी चॅम्पियन व गेल्या आठवड्यात इंडोनेशिया मास्टर्स सुपर सिरीजच्या अंतिम फेरीत धडक मारणाºया सायना नेहवालकडून भारताला मोठी आशा आहे. पुरुष एकेरीत एच. एस. प्रणय व बी. साई प्रणित यजमान भारताकडून मजबूत दावेदार असतील.आघाडीचे अनेक खेळाडू स्पर्धेत खेळत सहभागी होत नसल्यामुळे इंडिया ओपन २०१८ ची चमक काही अंशी धूसर झाली आहे. पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत दुसºया क्रमांकाचा खेळाडू मलेशियाचा ली चोंग वेई, चौथ्या क्रमांकाचा चीनचा चेंग लोंग, पाचव्या क्रमांकाचा कोरियाचा सोन वान हो आणि सहाव्या क्रमांकाचा चीनचा लिन डॅन यांसारख्या दिग्गज खेळाडूंनी स्पर्धेकडे पाठ फिरवली आहे. याव्यतिरिक्त महिला एकेरीमध्ये जागतिक क्रमवारीतील नंबर वन चीन ताइपेची ताऊ ज्यू यिंग, दुसºया क्रमांकाची जपानची अकाने यामागुची, कोरियाची सहाव्या क्रमांकाची सुंग जी ह्यून, विश्व चॅम्पियन जपानची नोजोमी ओकुहारा व आठव्या क्रमांकाची चीनची चेन युफेई या खेळाडू या स्पर्धेत दिसणार नाहीत. लंडन आॅलिम्पिकची कांस्यपदकविजेती व २०१५ ची चॅम्पियन सायनाला पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत ५५ व्या स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या सोफी होल्मबोई दाहलच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. उपांत्यपूर्व फेरीत सायनाची गाठ क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेल्या अमेरिकेच्या बेइवान झेंगसोबत पडण्याची शक्यता आहे, तर उपांत्य फेरीत तिला दुसºया मानांकित व दोनदा विश्व चॅम्पियन ठरलेल्या स्पेनच्या कॅरोलिन मारिनचे आव्हान राहण्याची शक्यता आहे.पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत तिसºया क्रमांकाचा खेळाडू आणि २०१४ चा चॅम्पियन किदाम्बी श्रीकांतला पहिल्या फेरीत क्रमवारीत ४३ व्या स्थानावर असलेल्या हाँगकाँगच्या ली च्युक यियूविरुद्ध खेळावे लागेल.सिंधूची सलामी नतालिया कोचविरुद्ध...जागतिक क्रमवारीत तिसºया क्रमांकावर असलेली व आॅलिम्पिक रौप्यपदकविजेती सिंधू आपल्या मोहिमेची सुरुवात क्रमवारीत ४३ व्या स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या नतालिया कोच रोहदेविरुद्ध करणार आहे. विश्व चॅम्पियनशिपचा रौप्यपदकविजेत्या सिंधूला सोपा ड्रॉ मिळाला आहे. तिला तिसºया मानांकित व जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या रतचानोक इंतानोनच्या रूपाने पहिले कडवे आव्हान मिळण्याची शक्यता आहे. उभय खेळाडूंदरम्यान उपांत्य फेरीत गाठ पडण्याची शक्यता आहे.
इंडिया ओपन बॅडमिंटन : सिंधू, श्रीकांतवर नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 1:07 AM