- आकाश नेवेचेन्नई- भारतीय खेळाडू विशेषतः एच. एस. प्रणॉय आणि किदाम्बी श्रीकांत यांचा खेळ हा दमदार आहे. ते चांगले प्रतिस्पर्धी आहेत, असे मत विश्व रँकिंगमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सेलसेन याने व्यक्त केले आहे. प्रीमियर बॅडमिंटन लीगसाठी भारतात आलेल्या व्हिक्टरशी लोकमतने संवाद साधला. यावेळी अॅक्सेलसेन म्हणाला की, भारतीय खेळाडू चांगला खेळ करतात.मात्र अजूनही चीनच्या खेळाडूंचे वर्चस्व कायम आहे. चीन हा अजूनही बॅडमिंटनमध्ये सुपर पॉवर आहे. मात्र इतर देशांचे खेळाडू अजूनही चांगला खेळ करतात. महिला एकेरीमध्ये सिंधू आणि सायना यांचा खेळ चांगला आहे. तर पुरूष एकेरीत प्रणॉय आणि विशेषतः श्रीकांत कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. काही युवा खेळाडू देखील चांगला खेळ करत आहेत.सर्व्हिसिंगच्या नवीन नियमांबाबत विचारले असता व्हिक्टर म्हणाला की, काही बाबी आपल्या हातात नसतात त्यांचा मी विचार करत नाही. काही वेळा उंचीचा त्रास होतो. मी अशा वेळी फक्त माझ्या खेळात सुधारणेचा विचार करतो. विश्वविजेता असलेला व्हिक्टर अक्सेलसेन पुढे म्हणाला की, मोठ्या स्पर्धांमध्ये खेळत असताना मी दबावाचा फारसा विचार करत नाही मला माहीत आहे की जर माझा सराव व्यवस्थित आहे, मी तंदुरुस्त आहे तर मला पराभूत करणे कठीण होईल.
भारतीयांचा खेळ दमदार- अॅक्सेलसेन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 5:18 PM