शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

किदाम्बी श्रीकांत उप-उपांत्यपूर्व फेरीत; प्रणॉयचे आव्हान संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 4:44 AM

भारताचा आघाडीचा शटलर किदाम्बी श्रीकांत याने सहज विजयासह आगेकूच करताना, चायना ओपन विश्व टूर सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

फुझोउ - भारताचा आघाडीचा शटलर किदाम्बी श्रीकांत याने सहज विजयासह आगेकूच करताना, चायना ओपन विश्व टूर सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याच वेळी, अन्य लढतीत एच. एस. प्रणॉय याला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागल्याने स्पर्धेतील गाशा गुंडाळावा लागला.पाचव्या मानांकित श्रीकांतने फ्रान्सच्या लुकास कोरवी याचा सरळ दोन गेममध्ये २१-१२, २१-१६ असा सहज पराभव करत दिमाखात आगेकूच केली. पुढील फेरीत श्रीकांतचा सामना इंडोनेशियाच्या टॉमी सुगिआर्तो याच्याविरुद्ध होईल. दुसरीकडे, प्रणॉयला आशियाई स्पर्धेचा सुवर्ण पदकविजेत्या इंडोनेशियाच्या जोनाथन क्रिस्टीविरुद्ध ११-२१, १४-२१ असा पराभव झाला. एकतर्फी झालेल्या या सामन्यात प्रणॉयला पुनरागमन करण्याची एकही संधी मिळाली नाही.अन्य एका लढतीत भारताची युवा शटलर वैष्णवी रेड्डी जाक्का हिला थायलंडच्या पोर्नापावी चोचुवोंग हिच्याविरुद्ध १२-२१, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. या आधीच आॅलिम्पिक रौप्य पदक विजेती पी. व्ही. सिंधूने उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. (वृत्तसंस्था)मिश्र गटात निराशामिश्र दुहेरी गटामध्ये भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी - अश्विनी पोनप्पा यांना पराभवाचा धक्का बसला.सातव्या मानांकित मलेशियाच्या चान पेंग सून - गोह लियू यिंग यांनी सात्विक - अश्विनी यांचा १८-२१, २१-१९, २१-१७ असा पराभव केला.पहिला गेम जिंकून शानदार सुरुवात केल्यानंतर सात्विक - अश्विनी यांना आपल्या खेळामध्ये सातत्य ठेवण्यात यश आले नाही.

टॅग्स :BadmintonBadmintonKidambi Srikanthकिदम्बी श्रीकांत