हाँगकाँग : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने सात महिन्यानंतर पहिल्यांदा दुसऱ्या फेरीचा अडथळा पार करीत हाँगकाँग ओपन बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचवेळी एच. एस. प्रणॉय या स्पर्धेच्या दुसºया फेरीत पराभूत झाला. श्रीकांतने आपलाच सहकारी सौरभ वार्मा याच्यावर कडव्या संघर्षात २१-११, १५-२१, २१-१९ अशी मात केली. सलामीला जपानचा केंटो मोमोटाविरुद्ध श्रीकांतला चाल मिळालेली. प्रणॉय दुसºया फेरीत इंडोनशियाचा जोनाथन ख्रिस्टीविरुद्ध १२-२१, १९-२१ असा पराभूत झाला.
हाँगकाँग ओपन बॅडमिंटन, किदाम्बी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2019 04:19 IST