जकार्ता : जागतिक क्रमवारीत १३ व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या एचएस प्रणॉयने पुरुष एकेरीत आठवा मानांकित चीनच्या लीन डॅनला तीन गेममध्ये पराभूत करून इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.दुसरीकडे भारताच्या समीर वर्माने डेन्मार्कच्या रासमस गेम्केला नमवित दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.प्रणॉयने सुरुवातीपासून चांगला खेळ करून लीन डॅनविरुद्ध पहिली गेम २१-१५ गुणांनी जिंकली. मात्र, यानंतर दुसºया गेममध्ये लीन डॅनने काही चांगले शॉट मारून आणि नेटजवळ प्लेसिंग करून प्रणयची दमछाक केली आणि २१-९ ने गेम आपल्या नावावर करत सामना रंगतदार केला. तिस-या गेममध्ये प्रणॉयने सर्वोत्कृष्ट खेळ करताना लीनचा घाम काढून २१-१४ गुणांनी गेम जिंकला.दुसरीकडे, समीरने गेम्केला एका तासाहून जास्त रंगलेल्या लढतीत २१-९, १२-२१, २२-२० गुणांनी नमविले. पहिला गेम मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर समीरला दुस-या गेममध्ये गेम्केकडून कडवा प्रतिकार मिळाला. गेम्केने दुसरा गेम जिंकत आव्हान कायम राखले. तिसºया गेममध्येही गेम्केने चांगला खेळ केला, परंतु निर्णायक गुणांची कमाई करत समीरने विजयी कूच केली. (वृत्तसंस्था)
प्रणॉयकडून लीन डॅनला पराभवाचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 1:32 AM