क्वालालंपूर - भारताच्या पी.व्ही. सिंधूने रिओ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या कॅरोलिन मारीनला पराभवाचा धक्का दिला. दमदार स्मॅश आणि नेट जवऴील परफेक्ट प्लेसिंगचा खेऴ करत सिंधूने मलेशिया ओपन वर्ल्ड टूर सूपर ७५0 स्पर्धेतील ही लढत 22-20, 21-19 अशी जिंकली. या विजयासह सिंधूने उपांत्य फेरीत प्रवेश केला. सिंधूसह श्रीकांत किदम्बीनेही उपांत्य फेरीत प्रवेश केला.
सायना नेहवालच्या पराभवाने सिंधूवर भारताचे स्पर्धेतील आव्हान जिवंत राखण्याची मदार होती. मात्र, उपांत्य फेरीच्या तिच्या मार्गात स्पेनच्या मारीनचा अडथऴा होता. उपांत्यपूर्व फेरीच्या या चुरशीच्या लढतीत सिंधूने कडवी झुंज देताना मारीनवर विजय मिऴवला. या विजयासह सिंधूने रिओतील पराभवाची परतफेड केली. उपांत्य फेरीत तिला चायनिज तैपेइच्या ताय झु यिंगचा सामना करावा लागणार आहे.
पुरुष एकेरीत श्रीकांतने फ्रांसच्या ब्रिस लेव्हर्डेजवर 21-18, 21-14 असा विजय मिऴवताना उपांत्य फेरीत धडक मारली.