राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन केवळ औपचारिकता जोपासण्यासाठी असते. खेळाचे कॅलेंडर पूर्ण करणे, हा यामागे हेतू असतो. तथापि, महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अरुण लखानी यांनी वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा बदलण्याचा ध्यास घेतला आहे. त्यांच्या कल्पक प्रयत्नातून तब्बल २२ वर्षांनंतर महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या यजमानपदाखाली होणा-या ८२ व्या सिनिअर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपचे आयोजन नव्या थाटात तसेच नव्या मापदंडांसह होत आहे. भारतीय बॅडमिंटन स्पर्धेच्या इतिहासात या आयोजनाला ऐतिहासिक समजले जाणार आहे. मानकापूरच्या विभागीय क्रीडा संकुलातील भव्य इन्डोअर सभागृहात सुरू झालेल्या स्पर्धेप्रसंगी एमबीए अध्यक्ष अरुण लखानी यांची डॉ. राम ठाकूर यांच्यासोबत झालेली ही सविस्तर चर्चा...प्रश्न : चॅम्पियनशिपची धडाक्यात सुरुवात झाल्यानंतर काय वाटते.?लखानी : मी आनंदी आहे, रिलॅक्स झालो. हे मोठे आयोजन आहे. आठ दिवस देशातील दिग्गज खेळाडू बहारदार खेळ करणार, हा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. कठोर मेहनतीनंतर यशाचे जे समाधान लाभते, ते वेगळेच.प्रश्न : या चॅम्पियनशिपच्या आयोजनामुळे राष्टÑीय स्पर्धेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. याबद्दल काय सविस्तर सांगणार?लखानी : होय, आतापर्यंत राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन औपचारिकता पूर्ण करण्यासाठी व्हायचे. पण माझ्या मते, नॅशनल्सला सुपर सिरिजचा दर्जा मिळायला हवा. यामुळे बक्षिसांच्या रकमेत वाढ होईल, खेळाडूंना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील. प्रवासखर्च मिळणार असेल आणि निवासव्यवस्था दर्जेदार असेल तर खेळाडूदेखील नॅशनल्स गेम खेळण्यास सज्ज होतील. दिग्गजांच्या सहभागामुळे अन्य ४००-४५० खेळाडूंना या स्टार्सकडून प्रेरणा घेण्याची संधी मिळेल.प्रश्न : परिवर्तन सातत्याने घडणाºया प्रक्रियेचा भाग आहे.?लखानी : हो, नक्कीच. हे केवळ वर्षभरासाठी नाही. प्रत्येक वर्षी यात सुधारणा होईल. यंदा पुरस्कार राशी ६० लाख रुपये आहे, पुढील वर्षी यात नक्कीच वाढ होईल. स्पर्धेचे आयोजनही व्यापक राहील. खेळाडूंमध्ये श्रेष्ठता मिळविण्यासाठी प्रतिस्पर्धी वाढत राहील. माझ्या मते, पुढील वर्षी राष्ट्रीय स्पर्धेची घोषणा होईल, त्या वेळी दिग्गज खेळाडू कॅलेंडरवर फुली मारून तयारीला लागतील.प्रश्न : सिनिअर पातळीवर हे निश्चितच प्रशंसनीय पाऊल आहे. पण सब-ज्युनिअर व ज्युनिअर पातळीबाबत कुठली योजना आहे का?लखानी : चांगला प्रश्न आहे. सिनिअर पातळीवर सातत्याने होत असलेल्या प्रयत्नांसह सब-ज्युनिअर व ज्युनिअर पातळीसाठीही योजना तयार करायला हव्यात आणि राष्ट्रीय पातळीवर महासंघ आणि राज्य पातळीवर राज्य संघटना गांभीर्याने योजना तयार करीत आहे, हे सांगताना मला आनंद होतो. येथे विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या एका कार्यक्रमाचा उल्लेख करणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार शालेय पातळीवर बॅडमिंटनचा प्रचार-प्रसार करण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाची सुरुवात देशातील अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही झालेली आहे.प्रश्न : बॅडमिंटनसाठी सर्वांत महत्त्वाची अडचण म्हणजे या खेळासाठी लागणाºया मूलभूत सुविधा आहेत. नागपूरसारख्या शहरात बॅडमिंटन कोर्टची संख्या मर्यादित असताना उदयोन्मुख खेळाडूंना सातत्याने अडचणींना सामोरे जावे लागते. ही समस्या दूर करण्यासाठी कुठली योजना आहे?लखानी : हो, नक्कीच. आम्ही राज्य सरकारला मानकापूरच्या या इन्डोअर सभागृहाला निश्चित कालावधीसाठी राज्य संघटनेकडे हस्तांतरित करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आम्हाला शालेय पातळीवरील उदयोन्मुख खेळाडूंसाठी दीर्घकालीन योजना तयार करण्यास सोपे जाईल आणि बॅडमिंटनच्या विकासासाठी हे पहिले पाऊल ठरू शकते. याला कशा प्रकारे सहकार्य मिळते, याबाबत उत्सुकता आहे.प्रश्न : बॅडमिंटन संघटक म्हणून खेळाला कुठली उंची गाठून देण्याबाबत विचार करता.?लखानी : (चेहºयावरील स्मित ढळू न देता) बोलायला बरेच आहे. पण प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास माझ्या उपस्थितीत बॅडमिंटनला क्रिकेटप्रमाणे देशभर लोकप्रिय करण्याचा विचार आहे. तसे बघता दुसºया खेळासोबत तुलना करायला नको आणि मलाही तसे वाटत नाही. पण एक बेंच मार्क म्हणून बॅडमिंटनला देशातील अव्वल खेळ म्हणून बघण्यास इच्छुक आहे.
राष्ट्रीय स्पर्धेला सुपर सीरिजसारखे महत्त्व यावे..., बॅडमिंटनला देशातील अव्वल खेळ बनविण्याची इच्छा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 3:24 AM