फुर्लटन (अमेरिका) : पारुपल्ली कश्यप मंगळवारी पात्रता फेरीसह सुरु होणाऱ्या अमेरिका ओपन बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याच्या निर्धाराने खेळणार आहे. दोन वर्षांआधी या स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याला भारताच्याच एच. एस. प्रणयविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.रविवारी कॅनडा ओपनमध्ये उपविजेता राहिलेल्या कश्यपचा आत्मविश्वास उंचावलेला असेल. कश्यप पुन्हा एकदा या बीडब्ल्यूएफ विश्व टूर सुपर ३०० स्पर्धेत भारतीय आव्हानाचे नेतृत्व करील. हैदराबादच्या कश्यपने कॅलगॅरी येथे अंतिम फेरीपर्यंतच्या प्रवासादरम्यान आपला जबरदस्त फिटनेस दाखवला होता. तेथे त्याने तीन गेमपर्यंत रंगलेले चार सामने खेळले होते. सहावा मानांकित कश्यप पहिल्या फेरीत २०१८ चा आशियाई ज्युनिअर चॅम्पियन व आपल्याच देशाचा लक्ष्य सेनविरुद्ध खेळेल.कश्यपचे उपविजेतेपदपारुपल्ली कश्यप कॅनडा ओपन सुपर १०० स्पर्धेच्या अंतिम फेरीत चीनच्या लि शि फेंग याच्याकडून तीन गेमच्या लढतीत पराभूत झाला. फेंगने १ तास १६ मिनिटे रंगलेल्या लढतीत सहाव्या मानांकित कश्यपला २०-२२, २१-१४, २१-१७ असे पराभूत केले.सामन्यानतंर कश्यपने टष्ट्वीट केले, ‘कॅनडा ओपनमध्ये रौप्यपदक. अंतिम लढत चांगली होती. मला सर्वोत्तम लय मिळाली होती हे मी सांगू शकत नव्हतो; परंतु लढत चांगली राहिली. माझ्यासाठी येथे थांबण्यासाठी एच. एस. प्रणॉयचे आभार.’
पी. कश्यप अमेरिकन ओपन स्पर्धेसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 5:14 AM