नवी दिल्ली : आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू आणि जगात आठव्या क्रमांकाचा खेळाडू किदाम्बी श्रीकांत यांना २१ आॅगस्टपासून ग्लास्गो येथे होणाºया बीडब्ल्यूएफ विश्व बॅडमिंटन स्पर्धेसाठी अनुक्रमे चौथे आणि आठवे मानांकन प्राप्त झाले आहे.विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेची २०१३ आणि २०१४ ची कांस्यपदक विजेती सिंधू हिला आॅलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिन मारिन हिच्यानंतर ठेवण्यात आले आहे. २०१५ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक मिळवणाºया आणि जगातील १६व्या क्रमांकाच्या भारताच्या सायना नेहवाल हिला १२ वे मानांकन प्राप्त झाले आहे. चीन तायपेची जगातील नंबर वन खेळाडू ताइ जू यिंग ही स्पर्धेतून बाहेर पडल्यामुळे जपानच्या अकाने यामागुची आणि कोरियाची सुंग जी ह्युन यांना अनुक्रमे पहिले आणि दुसरे मानांकन प्राप्त झाले आहे. इंडोनेशिया आणि आॅस्ट्रेलिया ओपनमध्ये सलग विजेतेपद पटकाविणाºयाआठव्या मानांकित श्रीकांतचा मानांकनात दोन वेळा आॅलिम्पिक विजेत्या चीनच्या लिन डेननंतर क्रमांक लागतो. इतर भारतीयांमध्ये अजय जयराम आणि बी. साई प्रणीत यांना अनुक्रमे १३ व १५ वे मानांकन प्राप्त झाले आहे. (वृत्तसंस्था)
पी. व्ही. सिंधू, के. श्रीकांत टॉप टेनमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 2:36 AM