लंडन : आॅल इंग्लंड चॅम्पियनशिप बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताची स्टार शटलर आणि रियो आॅलिम्पिकची रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू हिला अकाने यामागुची हिच्याकडून १९-२१,२१-१९,२१-१८ असा पराभव पत्करावा लागला. सिंधूच्या पराभवासोबत या स्पर्धेतील भारताचे महिला एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.येथे शनिवारी रात्री उशिरा झालेल्या सामन्यात सिंधू हिने पहिला गेम २१-१९ असा जिंकला. या गेमच्या सुरुवातीला सिंधूने ६ -० अशी आश्वासक सुरुवात केली. त्यावेळी या सामन्यावर सिंधू वर्चस्व गाजवेल असे चित्र होते. पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यावर जागतिक रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या यामागुची हिने दुसºया गेममध्ये चांगला खेळ केला. लांब रॅलींनी रंगलेल्या या सामन्यात सिंधू हिने अकाने यामागुची हिला चांगली लढत दिली.दुसºया गेमवर यामागुची हिने वर्चस्व राखले. मात्र अखेरच्या काही मिनिटात सिंधूने पुनरागमन करण्याचा जोरदार प्रयत्न केला.निर्णायक गेममध्ये सिंधू हिने सुरुवातीला आघाडी घेतली होती. ७२ व्या मिनिटालादेखील यामागुची हिने १६-१६ अशी बरोबरी साधली.त्यानंतर १८-१८ अशा बरोबरीवरून सलग तीन गुण मिळवत यामागुचीने सामना जिंकला आणि अंतिमफेरी गाठली.अंतिम फेरीत यामागुची हिची गाठ जागतिक रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर असलेल्या ताय त्झु यिंग हिच्याशी होणार आहे.अंतिम आठमधील हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. हुआंगने एक तास १७ मिनिटांच्या सामन्यात प्रणॉयचा २२-२०, १६-२१, २१-२३ ने पराभव केला. सामन्यात तिसºया गेममध्ये दोन्ही खेळाडू एका वेळी २०-२० अशा बरोबरीवर होते.प्रणॉयने वेगवान स्मॅश लगावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फटका नेटला लागला. हाच शॉट त्याला पुढे सतावत होता. एक चुकीचा फटका प्रणॉयसाठीमहागडा ठरला. तो सेमी फायनलपासून वंचित राहिला. सामन्यानंतर प्रणॉय म्हणाला, मला त्या शॉटवर गुण मिळाला पाहिजे होता. (वृत्तसंस्था)
पी. व्ही. सिंधूू पराभूत, उपांत्य फेरीत यामागुचीचा विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 1:57 AM