बर्मिंगहॅम : स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिला आॅल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या सलामीला कडव्या संघर्षात कोरियाची सुंग जी ह्यून हिच्याकडून पराभवाचा धक्का बसला. दुसरीकडे, पुरुष एकेरीत २०१७ चा सिंगापूर ओपन चॅम्पियन बी. साईप्रणित याने आपलाच देशबांधव एच. एस. प्रणॉयला २१-१९, २१-१९ असे पराभूत केले.सुंग जी हिच्याकडून मागील तीन सामन्यात पराभूत झालेल्या सिंधूला बुधवारी दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये आठ मॅचपॉर्इंट वाचविल्यानंतरही १६-२१, २२-२०, १८-२१ ने पराभवाचे तोंड पहावे लागले. या सामन्याआधी उभय खेळाडूंमध्ये जय-पराजयाचा रेकॉर्ड ८-६ असा होता. कोरियाच्या खेळाडूने सिंधूला पुन्हा एकदा ८१ मिनिटात नमविले.सिंधूने दुसºया गेममध्ये १७-२० अशा पिछाडीवर पडल्यानंटर तीनवेळा मॅचपॉर्इंट वाचविले. तिसºया आणि अखेरच्या गेममध्ये देखील पाचवेळा मॅचपॉर्इंट वाचविण्यात सिंधूला यश आले. सिंधू दहा लाख डॉलर रोख रकमेच्या या स्पर्धेतून चौथ्यांदा पहिल्या फेरीत बाहेर झाली. सुंग जी पुढील फेरीत हाँगकाँगची च्युंग एनगान हिच्याविरुद्ध खेळेल.महिला दुहेरीत मेघना जक्कमपुडी-पूर्वीश एस. राम ही जोडी कडव्या संघर्षानंतर रशियाची जोडी एकातेरिना बोलतोवा- एलिन देवेलतोवा या जोडीकडून २१-१८,१२-२१,१२-२१ ने पराभूत झाली.पुरुष गटामध्ये बी. साईप्रणितने विजयी सलामी देताना भारताच्या एच. एस. प्रणॉयला पराभवाचा धक्का दिला. सामना दोन गेममध्ये संपला असला तरी दोघांनीही तोडिस तोड खेळ करताना सामन्याची चुरस वाढवली. मात्र दोन्ही गेममध्ये मोक्याच्यावेळी खेळ उंचावलेल्या साईप्रणितने बाजी मारली. (वृत्तसंस्था)>माझ्यामते प्रतिस्पर्धीखेळाडूला सुरुवातीपासून आघाडी घेण्यापासून रोखायला हवे होते. खूप गुण दिल्याची भरपाई करणे माझ्यासाठी कठीण झाले होते. स्मॅश नेटवर लागत असल्याने ‘लक’ माझ्यासोबत नव्हतेच. मी बाहेर फटके मारले, पण एकूणच हा सामना चुरशीचा झाला. आजचा दिवसही माझा नव्हता. असे सामने होतात, तथापि यावर तोडगा काढावा लागेल, भक्कमपणे पुनरागमन करावेच लागेल. - पी.व्ही. सिंधू
पी. व्ही. सिंधूचे सलामीलाच ‘पॅकअप’, कोरियाच्या ह्यूनकडून पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2019 4:16 AM