लखनौ - भारताची बॅडमिंटनस्टार पी. व्ही. सिंधू हिला चेन्नई स्मॅशर्सकडून खेळताना दिल्ली डॅशर्सची खेळाडू सुंग जी हुएन हिने १५-११, १३-१५, १४-१५ असे पराभूत केले, तर दिल्ली डॅशर्सच्या टियाने हुएई याने मिळवलेल्या विजयाने दिल्लीच्या बाद फेरीच्या आशा कायम आहेत.लखनौमधील बाबू बनारसीदास यूपी बॅडमिंटन अॅकॅडमीत झालेल्या सामन्यात सिंधू हिने पहिला गेम १५-११ असा जिंकला. मात्र दुसºया गेममध्ये हुएन हिने आक्रमक खेळ करताना अखेरच्या क्षणी गुण मिळवत १५-१३ असा विजय मिळवला. यामुळे दोन गेमअखेर बरोबरी साधली गेली. निर्णायक गेममध्ये हुएन हिने एका गुणाच्या फरकाने सिंधूला पराभूत केले.भारताचा बी. सुमित रेड्डी आणि यांग ली यांनी इवान सोजनोव आणि व्लादिमीर इवानोव यांना १५-११, १५-१३ असे पराभूत केले.या लढतीत पहिल्या पुरुष दुहेरीच्या सामन्यात सुमित रेड्डीने यांग लीच्या साथीने विजय साजरा केला.पुरुष एकेरीत दिल्लीच्या वींग की वोंग विन्सेट याने चेन्नई स्मॅशर्सच्या ब्रीस लेव्हरडेझ याला १५-१०, १५-१३ असे पराभूत केले. विन्सेट याने पहिला गेम सहजतेने जिंकला, मात्र दुसºया लढतीत ब्रीस याने त्याला चांगलेच झुंजवले. एकवेळ ब्रीस आघाडीवर होता. मात्र विन्सेट याने चांगली आघाडी घेतली आणि विजय मिळवला.पुरुष एकेरीच्या दुसºया सामन्यात टियान हुवेई याने तानोन्सांग याला पराभूत करीत चेन्नईच्या या लढतीतील अपेक्षा कायम ठेवल्या.ताइ जु निंजा वॉरियरसारखी आहेभारताचा स्टार शटलर एच. एस. प्रणॉय याने तैवानची जागतिक क्रमवारीतील अव्वल महिला खेळाडू ताइ जु यिंग हिच्यावर कौतुकाचा वर्षाव करताला तिला ‘निंजा वॉरियर’ असे संबोधले. प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये (पीबीएल) सलग दहावा विजय मिळवणाºया प्रणॉयने म्हटले, ‘ताइ जु एक जबरदस्त खेळाडू असून ती मला एका निंजासारखी भासते. ती काही स्ट्रोक अशा पद्धतीने खेळते, ज्याच्यावर तुम्ही एक दशकापर्यंत अभ्यास करावा लागेल.त्यानंतरही तुम्हाला त्या स्ट्रोकवर पूर्ण नियंत्रण मिळवण्यातअडचणी येतील.तिच्या हातात अविश्वसनीय अनुभव असून ती अशी मुलगी आहे, जी बॅडमिंटन खेळताना खेळाचा सर्वाधिक आनंद घेते. यामुळेच ती विशेष खेळाडू ठरते.’‘मी तिच्यासह एकाच संघात असल्याचा मला आनंद आहे. शिवाय सराव सत्रात तिच्याविरुद्ध खेळण्याची संधीही मिळत आहे,’ असेही प्रणॉयने या वेळी म्हटले. ताइ जु हिने यंदाच्या सत्रामध्ये तब्बल ५ सुपरसिरिज जेतेपदे पटकावली.तसेच, पीबीएलमध्ये आतापर्यंत तिने सलग तीन सामने जिंकले आहेत. तिने अवध वॉरियर्सकडूनखेळत असलेल्या स्टार सायना नेहवालविरुद्ध आपला अखेरचा विजय नोंदवला. (वृत्तसंस्था)
पीबीएल : सिंधू पराभवाने चेन्नई पिछाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 1:11 AM