हैदराबाद : अलीकडेच संपलेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये स्पर्धेचा कार्यक्रम हा एक मुद्दा होता, पण मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी खेळाडूंनी कार्यक्रमासोबत जुळवून घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.गोपीचंद यांनी सांगितले की, ‘स्पर्धेचा कार्यक्रम एक मुद्दा होता; पण कधी-कधी आपण चुकीच्या टोकावर असतो. पी. व्ही. सिंधूची उपांत्य लढत शनिवारी रात्रीच्या सत्रात होती. तिला झोपायला दीड वाजला आणि दुसºयाच दिवशी सकाळच्या सत्रात अंतिम लढत खेळली जाणार होती. कधी-कधी छोट्या बाबीही सामन्यावर परिणाम करतात. कारण लढतीसाठी अतिरिक्त ऊर्जा आवश्यक असते.’ दरम्यान, प्रशिक्षकांनी याची सवय करून घेणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.गोपीचंद यांनी विश्व चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सिंधूच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. सिंधूला अंतिम लढतीत पराभव स्वीकारावा लागला. गोपीचंद म्हणाले, ‘ही लढत चुरशीची झाली. उभय खेळाडूंनी चांगला खेळ केला.
खेळाडूंना कार्यक्रमासोबत जुळवून घ्यावे लागेल : गोपीचंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 4:11 AM