मुंबई : ‘यंदाचे वर्ष व्यस्त असून, पुढील प्रमुख स्पर्धा आॅल इंग्लंड अजिंक्यपद आहे, शिवाय यंदा राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धाही होणार आहेत. त्यामुळे यंदा सातत्य राखून वर्षाअखेरीस जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी यायचे आहे,’ असे भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिने म्हटले.मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये सिंधूने वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, ‘यंदाचे वर्ष खूप मोठे आणि महत्त्वाचे आहे. ३ प्रमुख स्पर्धा खेळायच्या असल्याने, मी एका वेळी एका स्पर्धेवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करणार आहे. सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर या वर्षाच्या अखेरीस जागतिक क्रमवारीत मला स्वत:ला अव्वल स्थानीपाहायचे आहे.’ गतवर्षी झालेल्या दुबई सुपर सीरिज अंतिम सामन्यात, सिंधूला जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध ९४ मिनिटांच्या रोमांचक सामन्यात २१-१५, १२-२१, १९-२१ असा पराभव पत्करावा लागला होता. यामुळे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी येण्याची सिंधूची संधी थोडक्यात हुकली होती. या वेळी तिने गेल्या वेळी केलेल्या चुका टाळण्याचा विश्वासही व्यक्त केला.सिंधूला अनेक चुरशीच्या सामन्यात थोडक्यात पराभव पत्करावा लागला आहे. याविषयी ती म्हणाली की, ‘मी अंतिम फेरीपर्यंत धडक मारण्यात यशस्वी ठरते, हे एकप्रकारे चांगले आहे. त्याच वेळी दुर्दैवाने मी जागतिक अजिंक्यपद, दुबई ओपन आणि इंडियन ओपनचे अंतिम सामने थोडक्यात गमावले, परंतु यातून मला खूप शिकायला मिळाले असून,मला माझ्या चुकांमधून खूपशिकायचे आहे.’ यामध्ये सिंधूने ग्लास्गो जागतिक अजिंक्यपदअंतिम फेरीतील पराभवसर्वात निराशाजनक असल्याचेम्हटले. (वृत्तसंस्था)सिंधू म्हणाली, ‘प्रत्येक स्पर्धा वेगळी असते. त्यात, जागतिक अजिंक्यपद स्पर्धा सर्वात वेगळी असते. अन्य सामन्यांच्या तुलनेत तो सामना माझ्यासाठी सर्वात लांबलचक सामन्यांपैकी एक होता. या सामन्यातील पराभव निराशाजनक होता.’ त्याचप्रमाणे, दरवर्षी १५ स्पर्धा खेळण्यासाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या स्वत:ला तंदुरुस्त राखणे महत्त्वाचे असल्याचेही सिंधूने या वेळी म्हटले.एका वर्षात १५ स्पर्धा खेळण्यासाठी खेळाडूंना स्वत:ला तंदुरुस्त राखावे लागेल. कोणत्या स्पर्धेत खेळायचे, हा निर्णय खेळाडूचा असेल, शिवाय मी सध्या सुरू असलेल्या २१ गुणांच्या पद्धतीला प्राथमिकता देईन. जागतिक संस्थेने खेळाडूंकडून उत्तर मागविले असून, मी २१ गुणांची पद्धत चांगली असल्याचे म्हटले आहे. - पी. व्ही. सिंधू
क्रमवारीत अव्वल स्थानी यायचे आहे - पी. व्ही. सिंधू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 2:14 AM