नवी दिल्ली : विश्व बॅडमिंटन महासंघाच्या (बीडब्ल्यूएफ) व्यस्त वेळापत्रकावर स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने टीका केली. आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन पाठोपाठ होत असल्याने खेळाडूंकडे जखमांतून सावरण्यास पुरेसा वेळ नसल्याचे सायनाचे मत आहे.बीडब्ल्यूएफने २०१८ च्या नव्या वेळापत्रकात आघाडीच्या बॅडमिंटनपटूंना वर्षभरात किमान १२ स्पर्धा खेळणे अनिवार्य केले आहे. प्रीमियर बॅडमिंटन लीगचे (पीबीएल) उद्घाटन झाल्यानंतर सायना म्हणाली, ‘बीडब्ल्यूएफचा पुढील वर्षाचा कार्यक्रम अतिशय व्यस्त आहे. अव्वल खेळाडूंसाठी हे योग्य नाही. सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दोन स्पर्धांमध्ये पुरेसे अंतर असायला हवे. मी सलगपणे स्पर्धा खेळू शकत नाही. स्पर्धेत सहभागी होऊ शकते, पण जिंकू शकणार नाही.’पीबीएलनंतर ३ स्पर्धा आहेत. विश्व चॅम्पियनशिपआधी ३ सुपर सीरिजचे आयोजन होणार आहे. हे पाहता बीडब्ल्यूएफने इतके व्यस्त वेळापत्रक का आखले, हेच आकलनापलीकडचे आहे. खेळाडूंसाठी हे थकविणारे आणि आव्हानात्मक असल्याचे सायनाचे मत आहे.पीबीएलच्या तिसºया पर्वात अवध वॉरियर्सचे प्रतिनिधित्व करणारी सायना पुढे म्हणाली, ‘मी सर्वच स्पर्धा खेळणार की नाही, याची शाश्वती नाही. माझे प्राधान्य फिटनेसला आहे, स्पर्धा जिंकण्याला नाही.खेळाडूंकडून पुढच्या सत्रात राष्टÑीय चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची अपेक्षा बाळगणे योग्य आहे काय, असे विचारताच सायना म्हणाली,‘पुढच्या सत्रातील व्यस्त वेळापत्रक बघता राष्टÑीय चॅम्पियनशिप कुठेच बसत नाही. तीन दिवसांचीस्पर्धा झाल्यास माझ्या मते, कुणालाही फरक जाणवणार नाही. राष्टÑकुल, आशियाड आणि विश्व चॅम्पियनशिपच्या आयोजनामुळे प्रत्येक स्पर्धेदरम्यान दोन आठवड्यांत स्वत:ला सज्ज करण्याचे आव्हान असेल. खेळाडू जखमी झाला असेल तर त्याला जखमेतून सावरण्यास वेळ नाहीच, असे सायनाचे मत आहे.आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियन स्पेनची कॅरोलिना मारिन हिनेदेखील सायनाच्या मताशी सहमती दर्शविली. मारिन म्हणाली, ‘पुढील सत्रातील व्यस्त वेळापत्रक थकविणारे आहे. पुढच्या आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये लागू होणारे नवे नियम ‘मूर्ख बनविणारे’ असल्याचा उल्लेख केला. (वृत्तसंस्था)बीडब्ल्यूएफने गटातील एकेरीतील अव्वल१५ खेळाडूंना आणि दुहेरीच्या अव्वल १० जोड्यांना वर्षांत १२ स्पर्धांमध्ये भाग घेणे अनिवार्य केले आहे. असे न केल्यासत्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल.पीबीएलच्या तिसºया सत्रात ८ संघांत ८० खेळाडू आहेत. त्यात विश्व चॅम्पियनशिपमधील आठ पदक विजेते आणि नऊ आॅलिम्पिक पदकविजेते सहभागी होतील. दिल्ली, लखनौ, गुवाहाटी, हैदराबाद आणि चेन्नई येथे सामने खेळले जातील.‘बीडब्ल्यूएफ बॅडमिंटनला टेनिससारखे करण्याचा प्रयत्न करीत असेल तर मग ग्रॅण्डस्लॅमसारख्या केवळ चार-पाच स्पर्धा व्हायला हव्यात. त्यामुळे अधिक आर्थिक नफा आणि प्रसिद्धी होईल. मी बीडब्ल्यूएफ प्रमुख असते तर निश्चितपणे हेच केले असते. अधिक रोख पारितोषिकांवर मी आनंदी आहे, पण इतक्या स्पर्धा होत असतीलतर खेळाडूंचे काही खरे नाही...’- सायना नेहवाल
व्यस्त वेळापत्रकावर भडकली सायना, बीडब्ल्यूएफला धरले धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 1:53 AM