क्वाललांपूर : आॅलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल, पारुपल्ली कश्यप आणि किदाम्बी श्रीकांत यांनी आपापल्या लढतीमध्ये विजयमिळवत मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसºया फेरीत प्रवेश केला आहे.
सातव्या मानांकित सायनाने महिला एकेरीत हाँगकाँगच्या जाय शुआन देंग हिला १४-२१,२१-१८,२१-१८ असे पराभूत केले. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत पहिल्या गेममध्ये पिछाडीवर पडल्यावरही सायनाने दुसरा गेम आणि त्यानंतर निर्णायक गेममध्ये बाजी मारतसामना जिंकला. आता पुढील सामन्यात सायना हाँगकाँगच्या बिगरमानांकित पुइ यिन यिपविरुद्ध लढेल.
पुरुषांच्या एकेरी गटात पारुपल्ली कश्यप याने डेन्मार्कच्या रासमस गेमके याला तीन गेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात १९-२१, २१-१९, २१-१० असे पराभूत केले. कश्यपयालाही पहिल्या गेममध्ये पराभव स्विकारावा लागला होता. मात्र त्याने पुढचे दोन्ही गेम सहज जिंकत विजय मिळवला. दुसरीकडे, श्रीकांत याने केवळ ३० मिनिटातच बाजी मारताना हाँगकाँगच्या एंगस का लोंग एंग याला २१-१७,२१-११ असे पराभूत केले. (वृत्तसंस्था)