ग्लास्गो, दि. 26 - भारताची फुलराणी आणि लंडन ऑलिम्पिक पदक विजेती सायना नेहवाल हिने विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये स्कॉटलँडच्या क्रिस्टी गिलमौरचा पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. याआधी रिओ ऑलिम्पिकची पदक विजेती स्टार पी. व्ही. सिंधू हिने सुद्धा उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारताला दोन पदके निश्चित झाली आहेत.उपांत्यपूर्व फेरीत सायना नेहवाल हिचा स्कॉटलँडच्या क्रिस्टी गिलमौर विरुद्ध सामना झाला. यामध्ये सायना नेहवालने क्रिस्टी गिलमौर हिचा 21-19, 18-21, 21-15 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला. आता उपांत्य फेरीत सायना नेहवाल आणि नोजोमि ओकुहारा यांच्यात लढत होणार आहे. त्याआधी रिओ ऑलिम्पिकची पदक विजेती सिंधूने विश्व क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेली चीनची सून यू हिच्यावर सरळ सेटमध्ये विजय नोंदवित किमान कांस्य पदक निश्चित केले. 2013 आणि 2014 मध्ये कांस्य जिंकणा-या 22 वर्षांच्या सिंधूने शुक्रवारी 39 मिनिटांत 21-14, 21-9 अशा फरकाने विजय साजरा केला. विश्व क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या सिंधूची उपांत्य फेरीत दहाव्या स्थानावर असलेली चीनची चेन युफेईविरुद्ध गाठ पडणार आहे. युफेईने थायलंडची माजी चॅम्पियन रतनचोक इंतानोन हिच्यावर विजय नोंदविला.श्रीकांतला पदकाचा प्रबळ दावेदार समजले जात होते. इंडोनेशिया तसेच ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये जेतेपद तसेच सिंगापूर ओपनमध्ये दुस-या स्थानावर राहिलेला श्रीकांत फॉर्ममध्ये होता. तथापि कोरियाच्या सीन वान याने त्याच्यावर 49 मिनिटांत विजय मिळविला. डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सलसन आणि पाच वेळेचा चॅम्पियन लिन दान हे देखील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल झाले.
श्रीकांत स्पर्धेबाहेरदुसरीकडे श्रीकांतची सुरुवात खराब झाल्याने वानने लवकरच मोठी आघाडी संपादन केली. पण श्रीकांतला उशिरा सूर गवसताच गेममध्ये 8-8 अशी बरोबरी झाली होती. श्रीकांतने केलेल्या काही चुकांचा देखील त्याला फटका बसला. दुसºया गेमच्या सुरुवातीला प्रतिस्पर्धी खेळाडूने आघाडी मिळविल्यानंतर श्रीकांतने सलग सात गुणांची कमाई करताच गुणसंख्या 12-16 अशी झाली होती. श्रीकांतने काही फटके बाहेर मारताच कोरियाच्या खेळाडूचा विजय साकार झाला तर सलग 13 सामने जिंकण्याचे श्रीकांतचे स्वप्न मात्र भंगले.श्रीकांतने या लढतीपूर्वी जून महिन्यात सोन वानविरुद्ध (इंडोनेशिया सुपर सीरिज व आॅस्ट्रेलिया सुपर सीरिज) दोन सामन्यांत विजय मिळवला होता, पण आजच्या लढतीत मात्र त्याला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. कोरियन खेळाडूने शानदार कामगिरी करताना 49 मिनिटे रंगलेल्या लढतीत 21-14,21- ने विजय मिळवला. दुस-या गेममध्ये श्रीकांत सुरुवातीला संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. सोन वानने 7 गुणांची आघाडी घेतली होती. ब्रेकनंतर श्रीकांतने काही गुण घेतले, पण कोरियन खेळाडूने 13-5 अशी आघाडी घेतली होती.