बर्मिंघम : आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या पहिल्या फेरीत ‘फुलराणी’ सायना नेहवालला आपली पारंपरिक प्रतिस्पर्धी ताई जू यिंग सोबत सामना करावा लागणार आहे. तर पी.व्ही. सिंधूला सोपा ड्रॉ मिळाला आहे. तिचा सामना थायलंडच्या पोर्नपावी चोचुवोंग हिच्यासोबत होणार आहे. १४ ते १८ मार्च दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.विश्व रँकिंगमध्ये ११ व्या स्थानावर असलेली सायना ही २०१५ मध्ये आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहचली होती. तर गेल्याच महिन्यात झालेल्या इंडोनेशिया ओपनच्या अंतिम फेरीत चिनी तैपैईच्या ताई जू यिंग हिच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेत या पराभवाचे उट्टे फेडण्याची संधी सायनाकडे आहे.सिंधू हिला पहिल्या फेरीत फारशी अडचण जाणवणार नाही. मात्र दुसºया फेरीत तिचा सामना अमेरिकेच्या बिवेन च्यांग हिच्यासोबत होऊ शकतो. बिवेन हिने सिंधूला इंडिया ओपनमध्ये पराभूत केले होते. (वृत्तसंस्था)जगातील तिसºया क्रमांकाचा पुरुष खेळाडू किदाम्बी श्रीकांत याला चॅम्पियनशिपमध्ये तिसरे मानांकन देण्यात आले आहे. त्याचा पुढचा सामना ब्राईस लेवरडेज्चा सामना करावा लागला.पुरुष एकेरीत बी. साई प्रणीत आणि एचएस प्रणय यांचा सामना मजबूत प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबत होणार आहे. सिंगापूर ओपन चॅम्पियन प्रणितचा सामना कोरियाचा खेळाडू सोन वान हो सोबत तर प्रणयचा सामना चीनी तैपैईच्या तियन चेन हिच्यासोबत होणार आहे. दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी यांचा सामना जापानच्या ताकुरो होकी आणि युगो कोबायाशी यांच्यासोबत होईल. प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्की रेड्डी यांची लढत जर्मनीच्या मार्विन एमिल सिडेल आणि लिडा एफलार यांच्यासोबत होणार आहे.मनु अत्री आणि बी.सुमित रेड्डी इंग्लंडच्या मार्कस् एलिस आणि ख्रिस लँगरीज यांचा सामना करतील. अश्विनी पोनाप्पा आणि सिक्की सुरुवातीच्या फेरीतच मिसाकी मात्सुतोमो आणि अयाका तकाहाशी या दुसºया मानांकित जापानी जोडीसोबत खेळतील.महिला दुहेरीत जाकमपुडी मेघना आणि पुर्विशा एस राम यांचा सामना जापानच्या पाचव्या मानांकित शिहो तनाका आणि कोहोरु योनेमोतो यांच्यासोबत होईल.
सायनापुढे सलामीलाच तगडे आव्हान, सिंधूला मिळाला सोपा ड्रॉ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 5:13 AM