नागपूर : आॅलिम्पिक कांस्यविजेती आणि विश्वक्रमवारीत ११ व्या स्थानावर असलेली ‘फुलराणी’ सायना नेहवालने तुलनेत सरस असलेली रिओ आॅलिम्पिकची रौप्यविजेती दुस-या स्थानावरील खेळाडू पी. व्ही. सिंधूविरुद्धचा थरार जिंकून ८२ व्या राष्टÑीय वरिष्ठ गट बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. पुरुष एकेरीत विश्वक्रमवारीत दुस-या स्थानी असलेला किदाम्बी श्रीकांतला पेट्रोलियम बोर्डाचा खेळाडू एच. एस. प्रणय याच्याकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. या पराभवामुळे मागील २० सामने जिंकणाºया श्रीकांतची घोडदौडदेखील थांबली.सहा हजारांवर प्रेक्षकांच्या भरगच्च उपस्थितीत बुधवारी कोराडी मार्गावरील मानकापूर संकुलात खेळविण्यात आलेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात २८ वर्षीय सायनाने २१ वर्षीय सिंधूला ५३ मिनिटांत २१-१७, २७-२५ ने पराभूत करीत २००७ नंतर तिसरे राष्टÑीय विजेतेपद संपादन केले.सायना- सिंधू सामन्याबद्दल प्रचंड उत्कंठा होती. उभय खेळाडूंनी रोमहर्षक खेळ करीत चाहत्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. दोघीही प्रत्येक गुणासाठी अक्षरश: झुंजल्या. सायनाने आक्रमक सुरुवात करीत चुका टाळल्या. त्याचा लाभ तिला पहिला गेम २१-१७ असा जिंकण्यात झाला.दुसºया गेममध्ये मात्र सिंधूने सकारात्मक सुरुवात करीत प्रारंभी ५-१ अशी आघाडी मिळविली. पण सायनाने पिछाडी भरून काढून ६-६ अशी बरोबरी साधली. सिंधू जेव्हा १८-१४ अशी विजयाकडे वाटचाल करीत होती तोच सायनाने पुन्हा आक्रमक पवित्रा घेत सलग चार गुणांसह पुन्हा एकदा १८-१८ अशी बरोबरी केली.यानंतर गुणांचा थरार सुरू झाला. सायना पाच वेळा गेम आणि सामना जिंकण्याच्या स्थितीत आली असताना सिंधूने मुसंडी मारून संघर्ष केला. अखेर लढत २६-२५ अशी काठावर आली तोच सायनाने मारलेला शॉट सिंधूकडून परत न येता नेटमध्ये अडकताच सायनाचा सनसनाटी विजय साकार झाला. जेतेपदाबद्दल सायनाला २ लाखांचे रोख पारितोषिक देण्यात आले.श्रीकांत आणि प्रणय यांनी सुरुवातीपासून एकमेकांवर आघाडी घेण्याचे तंत्र अवलंबले होते. १२-१२ अशा बरोबरीनंतर प्रणयने श्रीकांतविरुद्ध नऊ गुण मिळवित गेम २१-१५ ने जिंकला. दुसºया गेममध्येही सुरुवातीला ८-५ अशी आघाडी प्रणयला श्रीकांतने कोर्टवर सर्वत्र नाचवित १३-१३ अशी बरोबरी केली. अनुभवी श्रीकांतने उत्कृष्ट प्लेसिंगच्या आधारे २१-१६ अशी बाजी मारून लढत बरोबरीत आणली होती.तिसºया आणि निर्णायक गेममध्ये प्रणयने श्रीकांतवर वर्चस्व गाजविले. काही वेळा दीर्घ रॅलीजमध्ये, तर काही वेळा ड्रॉपमध्ये चकवित सलग सात गुण संपादन करणारा प्रणय ९-२ ने आघाडीवर होता. श्रीकांतला त्याने कुठलीही संधी न देता १६-४ अशी आघाडी मिळविली होती. स्वत:च्या पराभवास श्रीकांतही जबाबदार ठरला. त्याने अचूक निर्णय घेण्यात दिरंगाई करताच प्रणयने २१-७ अशा विजयासह सिनियर नॅशनलचे पहिले जेतेपद पटकविले.बॅडमिंटनला पूर्ण सहकार्य करू : मुख्यमंत्रीमहाराष्टÑ बॅडमिंटन संघटनेला राज्यात खेळाचे आयोजन करायचे झाल्यास महाराष्टÑ शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. ८२ व्या सिनियर राष्टÑीय बॅडमिंटन स्पर्धेच्या समारोपप्रसंंगी विभागीय क्रीडा संकुलात मार्गदर्शन करताना २२ वर्षांनंतर महाराष्टÑाला स्पर्धेचे यजमानपद मिळाल्याचा उल्लेख करीत ज्यांचा खेळ टीव्हीवर पाहून प्रेरणा लाभायची त्या खेळाडूंचा खेळ प्रत्यक्षपणे पाहण्याची संधी लाभली, याबद्दल आपण सर्व भाग्यवान आहोत, असे सांगितले. राष्टÑीय स्पर्धेला भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल नागपूरकरांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानताच उपस्थितांनी टाळ््यांचा कडकडाट करीत दाद दिली.श्रीकांतला दहा लाखएका सत्रात ४ सुपर सिरिज जेतेपद पटकविल्याबद्दल विश्व क्रमवारीत दुसºया स्थानावर विराजमान झालेला के. श्रीकांतचा भारतीय बॅडमिंटन संघटनेतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १० लाखांचा चेक देऊन गौरव करण्यात आला.हा विजय अविस्मरणीयहा विजय आमच्यासाठी फार महत्त्वाचा होता. प्रतिस्पर्धी जोडीचा खेळ तुल्यबळ असल्याने आम्ही सहजपणे घेतले नाही. सामना जसजसा अंतिम टप्प्यात आला तशी माझी उत्कंठा वाढत गेली. हे पहिले राष्टÑीय जेतेपद आहे. या विजयाचा आनंद व्यक्त करायला माझ्याकडडे शब्द नाहीत.-अश्विनी पोनप्पा, मिश्र दुहेरी चॅम्पियनपहिले राष्टÑीय विजेतेपद मिळविणे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. मी वयाच्या १३ व्या वर्षापासून खेळत आहे, पण राष्टÑीय स्पर्धेचे जेतेपद प्रथमच मिळाले. हा विजय माझ्यासाठी सर्व काही आहे. श्रीकांतविरुद्ध विशेष डावपेच आखले नव्हते. रोजच एकमेकांविरुद्ध खेळत असल्याने आम्हाला परस्परांचा गेम माहिती आहे. माझे लक्ष्य प्रत्येक गुणावर होते. प्रत्येक सामन्यागणिक आत्मविश्वास उंचावत जातो.- एच. एस. प्रणयमिश्र दुहेरीत साईराज- अश्विनी यांनी प्रणव- सिक्कीला ५६ मि. २१-९,२२-२०,२१-१७ ने विजय नोंदविला. महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात अश्विनीने एन. सिक्की रेड्डीच्या सोबतीने संयोगिता घोरपडे-प्राजक्ता सावंत यांच्यावर २१-१४, २१-१४ ने विजय नोंदवित दुसरे जेतेपद मिळविले.
सायना नेहवाल, एच. एस. प्रणय ‘चॅम्पियन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 2:50 AM