बर्मिंघम : पहिल्याच फेरीत सायनापुढे माजी विजेत्या तेइ झू यिंग हिचे आव्हान होते. ड्रॉ खडतर होता; कारणरेकॉर्डवर झू वरचढ होतीच. त्यामुळेच या सामन्याकडे भारतीयांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, सायना पहिल्याच फेरीतून बाद झाली. झू हिने हा सामना २१-१४, २१-१८ ने जिंकला. सायनाच्या रूपात भारताला मोठा झटका बसला. झू हिने गेल्या पाच वर्षांत सायनाचा आठव्यांदा पराभव केला आहे. २०१५ मध्ये सायनाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे तिच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या.पहिल्या गेममध्ये तेइ झू हिच्या वेगवान फटक्यांचा सामना करण्यात सायना अपयशी ठरली. सायनाने दुसऱ्या गेममध्ये १६-११ अशी आघाडी मिळवल्यानंतरही संधी गमावली. सायनाने लांब रॅली लगावल्या; पण, झू जबरदस्त फॉर्ममध्ये होती. तिने केवळ ३८ मिनिटांच्या आत सामना जिंकला. कोर्टवर सेट होण्यासाठी सायनाने वेळ घेतला. दुसºया बाजूने झूने वेळ गमावला नाही. तिने लवकरच ३-१ अशी आघाडी घेतली होती. काही मिनिटांनी ही आघाडी ६-२ अशी झाली. झूने चुका केल्या. मात्र, त्याचा फायदा सायनाला उठवता आला नाही. झूने आघाडी ९-४ अशी केली. त्यानंतर सायनाने सलग तीन गुण मिळवले. एका वेळी सायनाने १०-१० अशी बरोबरी साधली होती; परंतु बे्रकमध्ये झूने ११-१० ने आघाडी घेतली. १४-१४ असा सामना झाल्यानंतर झूने आक्रमक खेळ केला. तिने सहा गुण मिळवले. त्यानंतर सायनाला पुनरागमनाची संधी मिळाली नाही. दुसºया गेममध्ये १७-१७ अशी बरोबरी साधत सायनाने संघर्ष केला खरा; पण तिला सामना वाचवता आला नाही. झूने २०-१९ अशी आघाडी घेत बाजी मारली. (वृत्तसंस्था)>श्रीकांत, सिंधू यांची विजयी सलामीसायनाच्या रुपाने भारताला पहिल्याच फेरीत मोठा धक्का बसला असला, तरी पी. व्ही. सिंधू आणि पुरुषांमध्ये किदाम्बी श्रीकांत यांनी मात्र विजयी सुरुवात केली. श्रीकांतने जागतिक क्रमवारीत २३व्या स्थानी असलेल्या ब्राइस लेवरदेज याचे कडवे आव्हान असे ७-२१, २१-१४, २२-२० संपुष्टात आणले. सिंधूनेही तीन गेममध्ये बाजी मारताना थायलंडच्या चोचुवाँग पॉर्नपावी हिला २०-२२, २१-१७, २१-९ असे नमविले.
सायना नेहवालचा पहिल्याच फेरीत अनपेक्षित पराभव, भारताची निराशाजनक सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 4:05 AM