नवी दिल्ली : फुलराणी सायना नेहवाल आणि आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू या सर्वात यशस्वी शिष्या आपल्यासाठी अनमोल रत्न असल्याचे भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य कोच पुलेला गोपीचंद याने म्हटले आहे.मागच्या महिन्यात आॅस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेत सायनाने विश्वक्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या सिंधूवर २१-१८, २३-२१ असा विजय नोंदवित सुवर्ण जिंकले होते.यावर गोपीचंद म्हणाले,‘कोच या नात्याने सायना आणि सिंधू या माझ्यासाठी अनमोल आहेत. दोघीही सारख्याच ताकदवान असून हैदराबादच्या अकादमीत जय- पराजय ही नित्याचीच बाब आहे. विजय आणि पराजय दोन्ही खेळाडूंना आपापला खेळ सुधारण्याची प्रेरणा देत असतात.स्पर्धेदरम्यान आणि सामन्याआधीच सिंधू आणि सायना यांचे मोबाइल ताब्यात घेतो. याशिवाय त्यांच्याकडे चॉकलेट किंवा लॅपटॉप तर नाही ना याची खात्री करून घेण्यासाठी त्यांची खोली आणि फ्रिजची झडती घेतो. माझे कठोर वागणे हे त्यांच्या विजयासाठी आवश्यक आहे. शिष्यांनी आॅलिम्पिक सुवर्ण जिंकावे हे माझे स्वप्न असल्याचे मत गोपीचंद यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले. सायनाने २०१२ च्या लंडन आॅलिम्पिकचे कांस्य जिंकले तर सिंधूने रिओ आॅलिम्पिकचे रौप्य पदक जिंकले आहे. (वृत्तसंस्था)सिंधू अन्य प्रतिस्पर्ध्यांप्रमाणेच - सायनानवी दिल्ली : पी.व्ही सिंधू हिला अन्य कोणत्याही प्रतिस्पर्ध्याप्रमाणेच मानत असल्याचे आॅलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिने सांगितले. सायना नेहवाल हिने सांगितले की,‘सिंधू विरोधातील तिची कामगिरी सरस का हे जाणून घेण्याचा विचार केलेला नाही.’ विश्व रँकिंगमध्ये तिसºया स्थानावर असलेल्या सिंधू विरोधात सायनाची कामगिरी ३-१ अशी आहे. सायना म्हणाली,‘ हे माझ्या किंवा सिंधू किंवा अन्य प्रतिस्पर्ध्यांबाबत नाही. मी तिला कोणत्याही अन्य प्रतिस्पर्ध्याप्रमाणेच मानते. मला काही खेळाडूंविरोधात खेळताना अडचण जाणवते तर काही खेळाडूंविरोधात मी सहजतेने खेळते.मला त्या खेळाडूंविरोधात सहजतेने खेळता येते.’मला माहीत नाही हे कोर्टवर कसे होते.’अंतिम फेरीत खेळणे हे मोठे यश - सिंधूनवी दिल्ली : नेहमीच अंतिम फेरीत पराभूत होणारी खेळाडू म्हणून भारताची स्टार खेळाडू पी.व्ही सिंधू हिच्यावर टीका केली जाते. मात्र शटलर सिंधू हिच्यावर या टीकेचा काहीच परिणाम होत नाही. तिच्या मते अंतिम फेरीत पोहचणे हेच एक मोठे यश आहे. आॅलिम्पिक आणि विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिपची रौप्यपदक विजेती सिंधू गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत अंतिम फेरीत सायना नेहवालकडून पराभूत झाली होती.सायना सोबतच्या स्पर्धेबाबत ती म्हणाली,‘प्रतिस्पर्धा तर आहे, मात्र खेळासाठी ही एक चांगली बाब आहे. कोर्टवर एकच कोणीतरी जिंकू शकतो. मीदेखील विजयी होईल.’गेल्या वर्षी रियो आॅलिम्पिक, ग्लास्गो विश्व चॅम्पियनशिप, दुबई सुपर सिरीज फायनल, इंडिया सुपर सिरीज आणि आॅल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पराभूत झाली होती.भारतीय बॅडमिंटन संघटनेने आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यात सिंधू हिने सांगितले की,‘यामुळे मला कोणताही फरक पडत नाही. लोक काहीही टीका करू देत; मात्र अंतिम फेरीत पोहचणे हेच एक मोठे यश आहे. सुरुवातीला मी उपांत्यपूर्व फेरी आणि उपांत्य फेरीत पराभूत होत असे, मात्र आता मी अंतिम फेरीत खेळते. हे एक पाऊल पुढे टाकल्यासारखे आहे.’ती म्हणाली,‘मी अनेक वेळा कडव्या सामन्यात पराभूत झालेली आहे. काही वेळा माझ्या खेळामुळे तर काही वेळा प्रतिस्पर्धी खेळाडूंमुळे मला पराभूत झाल्याचे वाईट वाटत नाही. मी चुकांमधून शिकते आणि मजबूत होऊन पुनरागमन करते.’सिंधू म्हणाली की, आता माझे लक्ष आशियाई स्पर्धेवर केंद्रित केले आहे.’ ही स्पर्धा आॅगस्ट महिन्यात इंडोनेशियात होईल.ती पुढे म्हणाली, सुपर सिरीज स्पर्धा आहे, मात्र आशियाई स्पर्धा मला महत्त्वाची वाटते, आशियाई बॅडमिंटनमध्ये स्पर्धा कठीण आहे. मात्र मी आपला सर्वश्रेष्ठ खेळ दाखवेल.’
सायना, सिंधू या ‘अनमोल रत्न’: गोपीचंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 12:49 AM