टोकियो : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूला जपान ओपनमध्ये महिला एकेरीच्या पहिल्या फेरीचा अडथळा पार करताना घाम गाळावा लागला. दुसरीकडे, किदाम्बी श्रीकांत व एस. एस. प्रणॉय यांनी सहज पुरुष एकेरीत आगेकूच केली.तिसºया मानांकित सिंधूला स्थानिक खेळाडू बिगरमानांकित सयाका ताकाहाशीविरुद्ध २१-१७, ७-२१, २१-१३ ने विजय नोंदवताना ५३ मिनिटे झुंज द्यावी लागली. सिंधूला पुढच्या फेरीत चीनच्या फांग्जी गाओच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. फांग्जी गाओने भारताच्या जक्का वैष्णवी रेड्डीचा २१-१०, २१-८ ने पराभव केला. पुरुष एकेरीत प्रणॉयने आशियाई सुवर्णपदक विजेता इंडोनेशियाच्या जोनाथान क्रिस्टीचा पहिल्या फेरीत २१-१८, २१-१७ ने पराभव केला, तर श्रीकांतने चीनच्या युशियांग हुआंगविरुद्ध २१-१३, २१-१५ ने सरशी साधली. प्रणॉय पुढच्या फेरीत इंडोनेशियाच्या अँथोनी सिनिसुकाच्या आव्हानाला सामोरा जाईल. श्रीकांत पुढच्या फेरीत विन्सेट वोंग विंगविरुद्ध भिडेल. श्रीकांत व प्रणय आशियाई स्पर्धेत दुसºया फेरीत पराभूत झाले होते. (वृत्तसंस्था)>भारताच्या समीर वर्मा कोरियाच्या ली डोंग क्यूनविरुद्ध १८-२१, २२-२०, १०-२१ ने पराभूत झाला. सात्विकसाईराज रंकीरेड्डी व अश्विनी पोनप्पा या मिश्र दुहेरीतील जोडीला पहिल्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला.सात्विकसाईराज व अश्विन यांना यिल्यू वँग आणि डोंगपिंग हुआंग या दुसºया मानांकित चीनच्या जोडीविरुद्ध १३-३१, १७-२१ ने पराभव स्वीकारावा लागला. चोपडा व रेड्डी या जोडीने मॅथ्यू फोगार्टी व इसाबेल झोंग या मलेशियन जोडीचा २१-९, २१-६ ने पराभव केला.
सिंधू, श्रीकांत जपान ओपनच्या दुसऱ्या फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 1:39 AM