नागपूर : विश्वक्रमवारीतील दुसºया स्थानावरील खेळाडू आणि रिओ आॅलिम्पिकची रौप्यविजेती पी. व्ही. सिंधू लंडन आॅलिम्पिकची कांस्यविजेती सायना नेहवाल आणि किदाम्बी श्रीकांत यांनी सोमवारी येथे सुरू असलेल्या ८२ व्या सिनियर नॅशनल बॅडमिंटन स्पर्धेची सहज उपांत्य फेरी गाठली. महाराष्ट्राचा बिगरमानांकित शुभांकर डे याने तिसरा मानांकित बी. साईप्रणीत याच्यावर उपांत्यपूर्व फेरीत खळबळजनक विजय नोंदवित पुरुष एकेरीची उपांत्य फेरी गाठली. ७३ मिनिटे रंगलेल्या दिवसअखेरच्या थरारक लढतीत शुभांकरने साईप्रणीतवर १३-२१, २१-१८, २२-२० अशा फरकाने मात केली.महाराष्टÑ बॅडमिंटन संघटनेच्या वतीने कोराडी रोडवरील विभागीय क्रीडा संकुलात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक सर्वच खेळाडू पराभूत झाल्याने नागपूरचे स्पर्धेतील आव्हान संपले. उपांत्यपूर्व फेरीत सायंकाळच्या सत्रात सायनाने आकर्षी कश्यपवर २१-१७, २१-१० ने विजय नोंदविला. सिंधूने मध्य प्रदेशची प्रतिभावान खेळाडू श्रेयांशी परदेसीचा २१-११, २१-१७ ने पराभव केला. त्याआधी, सकाळी हजारो शाळकरी विद्यार्थ्यांसह बॅडमिंटन चाहत्यांच्या उपस्थितीत या दिग्गजांनी उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत एकतर्फी विजय नोंदविले. सायना आणि सिंधू या अनेक वर्षांनंतर राष्टÑीय स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. सिंधूने अवघ्या २८ मिनिटांत पुण्याची रेवती देवस्थळे हिच्यावर २१-१६, २१-२ ने विजय साजरा केला. सायनाने जी. वृषालीविरुद्धची लढत २७ मिनिटांत २१-१२, २१-१० अशी सरळ गेममध्ये जिंकली.पुरुषांमध्ये विश्वक्रमवारीत दुसºया स्थानावर विराजमान झालेल्या किदाम्बी श्रीकांतने उपांत्यपूर्व लढतीत शुभम प्रजापतीचे आव्हान २९ मिनिटांच्या खेळात २१-१७, २३-२१ असे मोडीत काढून उपांत्य फेरीत धडक दिली. त्याआधी उपउपांत्यपूर्व फेरीत आर्यमन टंडनचा २१-१४, २१-१२ ने पराभव केला. एच. एस. प्रणय आणि पारुपल्ली कश्यप यांच्यात झालेला उपांत्यपूर्व सामना लक्षवेधी ठरला. त्यात प्रणयने कश्यपला २२-२०, २१-१९ अशी धूळ चारली.निकालमहिला एकेरी (उपउपांत्यपूर्व) : जी. ऋत्त्विका शिवानी वि. वि. साई उत्तेजिता राव २१-१४, २१-८, अनुरा प्रभुदेसाई वि. वि. सायली राणे २१-१९, २१-९, सायना नेहवाल मात आकर्षी कश्यप २१-१७, २१-१०, पी. व्ही. सिंधू वि. वि. श्रेयांशी परदेसी २१-११, २१-१७.पुरुष एकेरी (उपांत्यपूर्व) : एच. एस. प्रणय वि. वि. पारुपल्ली कश्यप २२-२०, २१-१९, लक्ष्य सेन मात अजय जयराम १५-१० (निवृत्त), किदाम्बी श्रीकांत वि. वि. शुभम प्रजापती २१-१७, २३-२१, शुभांकर डे वि. वि. बी. साई प्रणिथ १३-२१, २१—१८, २२-२०.
सिंधू, सायना, श्रीकांत उपांत्य फेरीत, शुभांकर डेकडून साईप्रणीतचा खळबळजनक पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 4:12 AM