क्वालालंपूर : सर्व्हिस जजकडून अनेकदा देण्यात येणा-या शंकास्पद निर्णयामुळे जगातील दिग्गज खेळाडू आणि मार्गदर्शकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो.जिंकलेला सामना गमाविण्याची भीतीही असते. चौफेर टीकेची झोड उठल्यानंतर विश्व बॅडमिंटन महासंघाने (बीडब्ल्यूएफ) पुढील वर्षीच्या आॅल इंग्लंड चॅम्पियनशिप दरम्यान सर्व्हिसचा नवा नियम प्रायोगिक तत्त्वावर लागू करण्याचा निर्णय घेतला.बीडब्ल्यूएफकडून हा नियम बँकॉकमध्ये आयोजित थॉमसअँड उबेर चषकाच्या अंतिम फेरीत, तसेच नानजिंग येथील बीडब्ल्यूएफ विश्व चॅम्पियनशिपदरम्यान लागू करण्यात येईल.जमैका येथे नुकत्याच झालेल्या वार्षिक आमसभेत अनेक निर्णय घेण्यात आले. त्यात नवा नियम लागू करण्याचादेखील समावेश आहे. नियमात काही बदल सुचवायचे असतील तर ते वार्षिक आमसभेत ठेवता येतील.हा नियम वर्षभर लागू राहणार असून सर्व ग्रेड वन आणि ग्रेड टू सह बीडब्ल्यूएफ सिरीजमध्येही लागू राहील. (वृत्तसंस्था)उंच खेळाडूंवर आले बंधननवीन नियमांमुळे उंच खेळाडूंना बॅकहँड सर्व्हिस करताना पूर्वी कंबरेपर्यंत (१.१५ मि.) सर्व्हिस करायची मुभा होती. छातीच्या खालच्या शेवटच्या बरगडीपर्यंत सर्व्हिस करायची मर्यादा होती. आता १.१५ मि. म्हणजे ४५ इंच मर्यादा ठरवून दिल्यामुळे उंच खेळाडूंना माकडहाडाच्या खालून सर्व्हिस करावी लागणार आहे. दुसरीकडे कमी उंचीच्या खेळाडूंना छातीपर्यंत (१.१५ मि. मर्यादा येत असेल) सुद्धा सर्व्हिस करता येईल. थोडक्यात सर्व्हिस करताना शटलीची दिशा वरच्या बाजूला असावी. निश्चितपणे उंच खेळाडूंना मर्यादा वाटत असली तरी सर्वांना समान नियमात बांधण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. - उदय साने, आंतरराष्टÑीय पंचअसा आहे नवा नियम...‘नव्या नियमानुसार सर्व्हिस करणाºया खेळाडूचा शटल रॅकेटमधून निघाल्यानंतर कोर्टपासून १.१५ मीटरपेक्षा कमी उंचीवर राहायला हवा.’
बॅडमिंटनमध्ये सर्व्हिसचा नवा नियम येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 1:24 AM