शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

कोणते गुण जिंकवतात पी. व्ही. सिंधूला? , सिंधूचे ओकुहाराविरुद्धचे विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 3:47 AM

सध्याचा काळ हा भारतीय बॅडमिंटनचा आणि क्रीडा क्षेत्रात भारतीय महिलांचा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे. सानिया, सायना, साक्षी, मिताली राज व सहकारी आणि पी. व्ही. सिंधू यशाचे नवनवे शिखर सर करीत आहेत. सिंधूचे कोरियन ओपनचे विजेतेपद ही या यशात पडलेली ताजी भर आहे.

ललित झांबरे ।जळगाव : सध्याचा काळ हा भारतीय बॅडमिंटनचा आणि क्रीडा क्षेत्रात भारतीय महिलांचा सुवर्णकाळ म्हटला पाहिजे. सानिया, सायना, साक्षी, मिताली राज व सहकारी आणि पी. व्ही. सिंधू यशाचे नवनवे शिखर सर करीत आहेत. सिंधूचे कोरियन ओपनचे विजेतेपद ही या यशात पडलेली ताजी भर आहे. यासोबतच आॅलिम्पिक रौप्यविजेती पहिली, जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तीन पदकं जिंकणारी पहिली, आॅलिम्पिक व जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी पहिली भारतीय या सिंधूच्या बिरुदांमध्ये कोरियन ओपन जिंकणारी पहिली या ताज्या बिरुदाची भर पडली आहे.सिंधूच्या या ताज्या यशाची दोन वैशिष्ट्ये दिसतात. पहिले म्हणजे तिने सकारात्मक विचार करून केलेला खेळ आणि दुसरे म्हणजे चुका सुधारण्याची तिची तयारी. यामुळेच जपानच्या नोझोमी ओकुहाराकडून जागतिक स्पर्धेतल्या पराभवाचे ती ऊट्टे काढू शकली. ग्लासगोला जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत नोझोमी ओकुहाराकडून सिंधू १९-२१, २२-२०, २०-२२ अशी हरली. त्यानंतर महिनाभरातच बाजी पलटवत तिने सोल इथे ओकुहारावर २२-२०, ११-२१, २१-१८ असा विजय मिळवला.स्कोअर बघा... फारसा फरक नाही. वेळ बघा... ग्लासगोला ११० मिनिटे आणि सोल इथे ८३ मिनिटे. संघर्षाचा वेळ घटला आणि निकालही बदलला. हे कसे झाले? वास्तविक सिंधूचे वडील रामन्ना यांच्या म्हणण्यानुसार जागतिक स्पर्धेतल्या पराभवानंतर ती नाराज होती; पण या नाराजीचा परिणाम तिने खेळावर होऊ दिला नाही.कोरियन विजेतेपदानंतर दिलेल्या प्रतिक्रियेत सिंधूने काय म्हटलेय... ती म्हणते, ‘सोलला पुन्हा त्याच ओकुहाराविरुद्ध अंतिम सामना खेळताना महिनाभरापूर्वीचा जागतिक अजिंक्यपद अंतिम सामन्यातला आघाडीनंतरचा पराभव आपल्या मनातही नव्हता. त्याचा अजिबात विचार न करता मी पुढचा प्रत्येक गुण महत्त्वाचा आहे हे स्वत:ला सांगत होते. दुसरा कोणताही विचार न करता शटलवर नियंत्रण राखणे महत्त्वाचे होते.’ याला म्हणतात सकारात्मक विचार. अशा विचारांनीच तिला दडपण न घेता खेळ करू दिला.सिंधूच्या सकारात्मक विचारसरणीचे आणखी एक उदाहरण पहा..! ती म्हणते की सामना ओकुहाराशी असो की आणखी कुणाशी... त्याने फरक पडत नसतो. महत्त्वाचे असते ते फक्त समोरच्याला हरवून जिंकणे. त्यामुळे अंतिम लढत कुणाशी आहे याच्याने फारसा फरक पडत नाही. सिंधूच्या यशातील दुसरे वैशिष्ट्य म्हणजे तिची चुका सुधारण्याची आणि मेहनत घेण्याची तयारी. तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद म्हणतात, की ग्लासगोतल्या पराभवानंतर आम्हाला तयारीसाठी फारसा वेळ मिळाला नाही; पण मिळाला त्या वेळेत आम्ही सिंधूच्या खेळात आक्रमकता आणण्यावर आणि ग्लासगोत ज्या चुका झाल्या त्या सुधारण्यावर भर दिला.गोपीचंद यांच्याप्रमाणेच सिंधूला तिचे वडील, व्हॉलिबॉलपटू रामन्ना हेसुद्धा टीप देत असतात. त्यांनी निरीक्षणातून हेरलेली ओकुहाराची खेळाची शैली आणि त्यानुसार आखलेले डावपेच सिंधूला विजयी बनवणारे ठरले. जागतिक स्पर्धेवेळी रामन्ना यांनी पाहिले की, सिंधूच्या बॅकहँडवर डाऊन द लाईन ओकुहारा अधिक मारा करत होती आणि त्यानंतर चपळाईने नेटजवळ येत सिंधूला अडचणीत आणत होती. त्यामुळे ओकुहाराच्या या चाली निष्प्रभ ठरवण्यासाठी रामन्ना यांनी सिंधूला सल्ला दिला, की काही वेळा शटल बॅकहँडकडे ठेव, जेणेकरून ओकुहारा गोंधळात पडेल की आता परतीचा फटका पुढ्यात टाकायचा की बॅकहँडला द्यायचा. सिंधूने असेच केले आणि हे डावपेच यशस्वी ठरले असे रामन्ना म्हणतात.रामन्ना यांनीच दिलेल्या माहितीनुसार, सिंधूला खेळताना मजा येते. ती खेळाचा आनंद घेते आणि म्हणूनच सरावात ती कधी थकत नाही की कंटाळत नाही. आनंद घेत खेळणे हेच त्यांच्या मते तिच्या यशाचे गमक आहे.>२०१२युवा आशियाई स्पर्धा१८-२१, २१-१७, २२-२०२०१७सिंगापूर ओपन१०-२१, २१-१५,२२-२०२०१४ हाँगकाँग ओपन१७-२१, २१-१३, ११-२१२०१५ मलेशिया मास्टर्स२१-१९, १३-२१, ८-२१२०१६ आशियाई स्पर्धा २१-१८, १२-२१, १२-२१२०१७ जागतिक स्पर्धा १९-२१, २२-२०, २०-२२२०१६रिओ आॅलिम्पिक२१-१९, २१-१०२०१७कोरियन ओपन२२-२०, ११-२१, २१-१८