शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप: पी.व्ही. सिंधूचे पदक निश्चित, पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीत पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 11:58 PM

आॅलिम्पिक रौप्य विजेती स्टार पी. व्ही. सिंधू हिने शुक्रवारी विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यफेरीत धडक देत देशासाठी पदक निश्चित केले. दुसरीकडे किदाम्बी श्रीकांत याला पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करता आला नाही.

ग्लास्गो : आॅलिम्पिक रौप्य विजेती स्टार पी. व्ही. सिंधू हिने शुक्रवारी विश्व बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यफेरीत धडक देत देशासाठी पदक निश्चित केले. दुसरीकडे किदाम्बी श्रीकांत याला पुरुष एकेरीत उपांत्यपूर्व फेरीचा अडथळा पार करता आला नाही.रिओ आॅलिम्पिकची पदक विजेती सिंधूने विश्व क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेली चीनची सून यू हिच्यावर सरळ गेममध्ये विजय नोंदवित किमान कांस्य निश्चित केले. २०१३ आणि २०१४ मध्ये कांस्य जिंकणाºया २२ वर्षांच्या सिंधूने आज ३९ मिनिटांत २१-१४, २१-९ अशा फरकाने विजय साजरा केला. विश्व क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या सिंधूची उपांत्य फेरीत दहाव्या स्थानावर असलेली चीनची चेन युफेईविरुद्ध गाठ पडणार आहे. युफेईने थायलंडची माजी चॅम्पियन रतनचोक इंतानोन हिच्यावर विजय नोंदविला.श्रीकांतला पदकाचा प्रबळ दावेदार समजले जात होते. इंडोनेशिया तसेच आॅस्ट्रेलिया ओपनमध्ये जेतेपद तसेच सिंगापूर ओपनमध्ये दुसºया स्थानावर राहिलेला श्रीकांत फॉर्ममध्ये होता. तथापि कोरियाच्या सीन वान याने त्याच्यावर ४९ मिनिटांत विजय मिळविला. डेन्मार्कचा व्हिक्टर एक्सलसन आणि पाच वेळेचा चॅम्पियन लिन दान हे देखील पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत दाखल झाले.सिंधूने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करीत थेट विजय साजरा होईस्तोवर मागे वळून पाहिले नाही. पहिल्या गेममध्ये सून यू निराश दिसली. सिंधूने याचा लाभ घेत सात गेमपॉर्इंटसह दर्शनीय ड्रॉप शॉटवर विजय मिळविला.दुसºया गेमची सुरुवात दीर्घ रॅलीसह झाली. पण सिंधू तब्बल १८-८ ने आघाडीवर जाताच सामना संपणार हे निश्चित झाले. सून हिने मारलेला फटका बाहेर जाताच सिंधूने गेम आणि सामना जिंकला. सिंधूने शानदार खेळ करीत प्रतिस्पर्धी खेळाडूला कोर्टवर चारही दिशेने धावायला भाग पाडले. काही वेळा तिने चाणाक्षपणे खेळून चीनच्या खेळाडूला चकितही केले. दोन्ही गेममध्ये सिंधूचे फटके परतविण्याच्या प्रयत्नांत चीनच्या खेळाडूची चांगलीच दमछाक झाली होती. सिंधूने मिळविलेला हा अप्रतीम विजय ठरला.(वृत्तसंस्था)श्रीकांत स्पर्धेबाहेरदुसरीकडे श्रीकांतची सुरुवात खराब झाल्याने वानने लवकरच मोठी आघाडी संपादन केली. पण श्रीकांतला उशिरा सूर गवसताच गेममध्ये ८-८ अशी बरोबरी झाली होती. श्रीकांतने केलेल्या काही चुकांचा देखील त्याला फटका बसला. दुसºया गेमच्या सुरुवातीला प्रतिस्पर्धी खेळाडूने आघाडी मिळविल्यानंतर श्रीकांतने सलग सात गुणांची कमाई करताच गुणसंख्या १२-१६ अशी झाली होती. श्रीकांतने काही फटके बाहेर मारताच कोरियाच्या खेळाडूचा विजय साकार झाला तर सलग १३ सामने जिंकण्याचे श्रीकांतचे स्वप्न मात्र भंगले.श्रीकांतने या लढतीपूर्वी जून महिन्यात सोन वानविरुद्ध (इंडोनेशिया सुपर सीरिज व आॅस्ट्रेलिया सुपर सीरिज) दोन सामन्यांत विजय मिळवला होता, पण आजच्या लढतीत मात्र त्याला या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. कोरियन खेळाडूने शानदार कामगिरी करताना ४९ मिनिटे रंगलेल्या लढतीत २१-१४, २१-१८ ने विजय मिळवला. दुसºया गेममध्ये श्रीकांत सुरुवातीला संघर्ष करीत असल्याचे चित्र होते. सोन वानने ७ गुणांची आघाडी घेतली होती. ब्रेकनंतर श्रीकांतने काही गुण घेतले, पण कोरियन खेळाडूने १३-५ अशी आघाडी घेतली होती.पी. व्ही. सिंधू‘‘ मी माझ्या कामगिरीवर समाधानी आहे. सून यू प्रतिस्पर्ध्यापुढे आव्हान निर्माण करणारी खेळाडू आहे. मी सर्वोत्तम कामगिरी केली आणि सर्वकाही माझ्यासाठी अनुकूल ठरले. गेल्यावेळी दुबईमध्ये मला तिच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता.’’