नानजिंग (चीन) : भारताची महिला बॅटमिंटनपटू सानया नेहवालने जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. सायनाने उपउपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या रॅटचानोक इन्टॅनॉनला 21-16, 21-19 असे पराभूत केले.
सामन्याच्या पहिल्या गेममध्ये सायना नेहवाल आणि रॅटचानोक यांच्यामध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली. पहिल्या गेममध्ये दोघींमध्ये 5-5 अशी बरोबरी पाहायला मिळाली. पण त्यानतर मात्र सायनाने सामन्यात आघाडी मिळवायला सुरुवात केली. त्यानंतर 10-8 आणि त्यानंतर 14-10 अशी आघाडी सायनाने घेतली होती. ही दमदार आघाडी सायनाने कायम ठेवली आणि पहिला गेम 21-16 असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये मात्र रॅटचानोकने सायनाला कडवी झुंज दिली. दुसऱ्या गेमच्या अखेरपर्यंत तिने सायनाला चांगलेच झुंजवले, पण दुसरा गेम मात्र तिला जिंकता आला नाही. दुसऱ्या गेममध्ये दोघींची 19-19 अशी बरोबरी झाली होती. पण त्यानंतर सायनाने सलग दोन गुण पटकावत गेमसह सामनाही जिंकला.