नागपूर : भारतात बास्केटबॉलचा दर्जा उंचावत असून, सरकारने सुविधा दिल्या तर भारतीय संघही आंतरराष्ट्रीय पातळीवर सकारात्मक निकाल देऊ शकतो, असे मत बिकानेरचा १५ वर्षीय युवक राजवीरसिंग भाटीने व्यक्त केले. भाटीने काठमांडू येथे आयोजित दक्षिण आशियन अंडर-१६ बास्केटबॉल स्पर्धेत जेतेपद पटकावणा-या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त भाटी येथे आला आहे.सध्या नोएडा येथे एनबीए अकादमीत सराव करीत असलेल्या भाटीने या वेळी एसजेएएनच्या कार्यालयात पत्रकारांसोबत संवाद साधला. तो म्हणाला, ‘युरोपियन व अन्य देशांमध्ये बास्केटबॉलचा दर्जा बघता आपण पिछाडीवर असल्याचे कबूल करतो. यापूर्वीच्या तुलनेत भारतात आता या खेळासाठी सुविधा वाढलेल्या आहेत. जर तुमच्यामध्ये प्रतिभा असेल तर बास्केटबॉलमध्येही चांगले करिअर करता येते.’मलेशिया येथे होणाºया आशिया कप स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याचे पुढचे लक्ष्य आहे, असेही त्याने सांगितले. भाटी चीन व आॅस्ट्रेलियामध्ये १० दिवसांच्या शिबिरांमध्ये सहभागी झाला होता. तो म्हणाला, ‘सध्या मी नोएडातील एनबीए अकादमीमध्ये सराव करीत आहे. त्यासोबत शिक्षणावरही लक्ष केंद्रित केले आहे.’यापूर्वी भाटी गुजरातमध्ये झालेला भारताच्या अंडर-१४ संघाच्या शिबिरात सहभागी झाला होता. त्यासोबत राजस्थानला राष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवून देण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली आहे. सहा फूट दोन इंच उंची लाभलेला भाटी आपल्या स्वप्नाबाबत बोलताना म्हणाला, ‘भारतीय बास्केटबॉल संघ आॅलिम्पिकसाठी पात्र ठरावा, असे माझे स्वप्न आहे.’ भारतीय बॉस्केटबॉल संघाने यापूर्वीकेवळ एकदाच आॅलिम्पिकमध्ये (मॉस्को आॅलिम्पिक १९८०) प्रतिनिधित्व केले आहे.काठमांडू येथील स्पर्धेमध्ये हा अनुभव चांगला होता. भूतान, नेपाळ, बांगलादेश आणि मालदीव यांच्यासह आम्ही दक्षिण आशियातील सर्व देशांविरुद्ध विजय मिळवला आणि जेतेपद पटकावले.- राजवीरसिंग भाटी
भारतात बास्केटबॉलचा दर्जा उंचावतोय, राजवीरसिंग भाटीचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 12:36 AM