शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

राष्ट्रीय बास्केटबॉल : महाराष्ट्राच्या पदरी निराशा, पुरुष व महिला संघांचा पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 02:23 IST

पुरुष व महिला संघांना अनुक्रमे पश्चिम बंगाल आणि रेल्वेविरुद्ध पराभवास सामोरे जावे लागल्याने ६८व्या राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा दिवस महाराष्ट्रासाठी निराशाजनक ठरला

ललित नहाटा चेन्नई : पुरुष व महिला संघांना अनुक्रमे पश्चिम बंगाल आणि रेल्वेविरुद्ध पराभवास सामोरे जावे लागल्याने ६८व्या राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा दिवस महाराष्ट्रासाठी निराशाजनक ठरला. महाराष्ट्राच्या पुरुषांचा पश्चिम बंगालविरुद्ध ४९-५४ असा, तर महिलांचा रेल्वेविरुद्ध ४७-९८ असा मोठा पराभव झाला.येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत विजयी सलामी दिलेल्या महाराष्ट्राच्या पुरुषांना पश्चिम बंगालविरुद्ध कामगिरीत सातत्य ठेवता आले नाही. सावध सुरुवात केल्यानंतर पहिल्या क्वार्टरमध्ये महाराष्ट्र संघ १०-१२ असा थोडक्यात पिछाडीवर राहिला. अमित गहलोत याने महाराष्ट्राकडून चांगली कामगिरी केली. पश्चिम बंगालच्या उंचपुºया खेळाडूंनी आपल्या उंचीचा फायदा घेत दुसºया क्वार्टरमध्ये १२ गुणांची आघाडी मिळवत मध्यंतराला २९-१७ असे वर्चस्व मिळवले.दुसºया सत्रात महाराष्ट्राने पुनरागमनाचे चांगले प्रयत्न केले. राकेशने एकट्याने ७ गुणांची कमाई केली, मात्र तरीही बंगाल संघाने ४१-३३ अशी आघाडी कायम राखली. यावेळी पिछाडी कमी करण्याचेच समाधान महाराष्ट्राला मिळाले. चौथ्या व निर्णायक क्वार्टमध्येही महाराष्ट्राने झुंजार खेळ केला. परंतु, मोक्याच्यावेळी झालेल्या चुकांचा फटका बसल्याने अखेर पश्चिम बंगालने ५४-४९ अशी बाजी मारत महाराष्ट्राला पराभवाचा धक्का दिला.दुसरीकडे महाराष्ट्राच्या महिला संघाला पराभवाचा सामना करावा लागला. चांगली सुरुवात करून रेल्वेला कडवी टक्कर दिलेल्या महाराष्ट्राला पहिल्या क्वार्टरमध्ये माफक चुकांचा फटका बसला. या जोरावर रेल्वेने सलग तीन गुणांची कमाई करत जोर पकडला व २७-१४ अशी भक्कम आघाडी घेतली.यानंतर रेल्वेने अधिक जोरदार खेळ करत मध्यंतराला ५२-२१ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. मुग्धा अमराओतकर हिने १०, तर शिरीन लिमये व श्रुती शेरिगर यांनी प्रत्येकी९ गुणांची कमाई करत रेल्वेलाटक्कर देण्याचा अपयशी प्रयत्नकेला. रेल्वेने अखेर ७६-३१ अशी भलीमोठी आघाडी घेत सामन्यावर शिक्कामोर्तब केले.