शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
3
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
5
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
6
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
7
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
8
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
9
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
10
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
11
पोलिसांची अशीही भाऊबीज भेट, डोंबिवलीत रिक्षात हरवलेली बॅग महिलेला दिली शोधून
12
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
13
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?
14
‘इंडिगो’च्या विमानांत १४ नोव्हेंबरपासून बिझनेस क्लास
15
मराठी विषय घेऊ न देणाऱ्या कॉलेजांची चाैकशी, विद्यापीठाकडून समिती स्थापन
16
दिवाळीचा मुहूर्तही कापूस खरेदीविना, शेतकऱ्यांना प्रतीक्षा, खरेदी केंद्र सुरू केले नसल्याने भाव पडण्याची भीती
17
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
18
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
19
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
20
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार

राष्ट्रीय बास्केटबॉल :महाराष्ट्राच्या महिलांचे आव्हान संपुष्टात, छत्तीसगडकडून पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 1:55 AM

छत्तीसगडविरुद्ध झालेल्या निराशाजनक पराभवानंतर महाराष्ट्राच्या महिला संघाला ६८व्या राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेतून उपांत्यपूर्व फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. सांघिक खेळाचा अभाव दिसल्याने महाराष्ट्राचा छत्तीसगडविरुद्ध ६१-९० असा पराभव झाला.

ललित नहाटाचेन्नई : छत्तीसगडविरुद्ध झालेल्या निराशाजनक पराभवानंतर महाराष्ट्राच्या महिला संघाला ६८व्या राष्ट्रीय बास्केटबॉल अजिंक्यपद स्पर्धेतून उपांत्यपूर्व फेरीतच आपला गाशा गुंडाळावा लागला. सांघिक खेळाचा अभाव दिसल्याने महाराष्ट्राचा छत्तीसगडविरुद्ध ६१-९० असा पराभव झाला.येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात छत्तीसगडने आक्रमक सुरुवात करताना महाराष्ट्रावर अखेरपर्यंत दबाव राखले. पहिल्या ५ मिनिटांमध्येच त्यांनी १५-६ अशी मोठी आघाडी मिळवत घट्ट पकड मिळवली. ७ फूट उंच असलेल्या पूनम चतुर्वेदी, अंजू लाक्रा आणि संगीता कौर या त्रिकूटाच्या जोरावर छत्तीसगडने पहिल्या क्वार्टरमध्ये २६-१० अशी एकतर्फी आघाडी घेतली.यानंतर आणखी वेगवान खेळ करताना छत्तीसगडने महाराष्ट्रावर कमालीचे दडपण आणले. महाराष्ट्राच्या महिलांनीही पुनरागमनाचा चांगला प्रयत्न केला; परंतु छत्तीसगडच्या वेगवान खेळापुढे त्यांचा निभाव लागला नाही. छत्तीसगडने मध्यंतराला ४२-२६ अशी भक्कम आघाडी मिळवली.तिसºया क्वार्टरमध्ये महाराष्ट्राने कडवी टक्कर दिली. या वेळी महाराष्ट्र पुनरागमन करणार अशीच शक्यता होती. परंतु सदोष नेमबाजीचा फटका बसल्याने तिसºया क्वार्टरमध्येही छत्तीसगडचे ६५-५४ असे वर्चस्व राहिले. अखेरच्या क्वार्टरमध्येही छत्तीसगडने चेंडूवर अधिक वेळ ताबा राखताना महाराष्ट्रावर वर्चस्व मिळवत अखेर ९०-६१ अशा विजयावर शिक्कामोर्तब केले. महाराष्ट्राकडून कॅरिना मेनेझेस हिने सर्वाधिक १८ गुण मिळवले.