ललित नहाटा मुंबई : राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर महाराष्ट्राच्या महिला संघाने उत्तर प्रदेशविरुद्ध ८५-७१ अशी बाजी मारली. आता महाराष्ट्राच्या महिला बुधवारी तमिळनाडूविरुद्ध पाचव्या - सहाव्या स्थानासाठी खेळतील.जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने वेगवान सुरुवात करताना वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. यूपीनेही यावेळी चांगली टक्कर देताना पुनरागमन केले, परंतु तरीही महाराष्ट्राने पहिल्या क्वार्टरअखेर २१-१६ अशी आघाडी मिळवली. श्रुती शेरीगर हिने अप्रतिम कौशल्य सादर करताना दुसºया सत्रात यूपी संघाविरुद्ध दबदबा राखला. मुग्धानेही तिला मोलाची साथ देताना यूपीला दबावाखाली आणले आणि महाराष्ट्राने मध्यंतराला ४४-३३ अशी आघाडी कायम राखली.शिरीनने आपल्या उंचीचा फायदा घेत तिसºया क्वार्टरमध्ये वेगवानखेळ केला. याजोरावर महाराष्ट्राने ६०-५१ अशी आघाडी घेतली. यूपीनेही जोरदार प्रत्युत्तर देताना चौथ्या आणि अखेरच्या क्वार्टरसाठी महाराष्ट्राला इशारा दिला. यावेळी, महाराष्ट्राने भक्कम बचावावर भर देतानायूपीचे आक्रमण रोखत अखेर८५-७१ अशा आघाडीसह विजय निश्चित केला.महाराष्ट्राकडून मुग्धा अम्राओतकर (२५), श्रुती शेरिगर (२४), शिरीन लिमये (१३) आणि साक्षी अरोरा (१०) यांनी शानदार खेळ केला. त्याचवेळी, पराभूत यूपीकडून वैष्णवी यादव (१९), संगीता दास (१६) आणि प्रीती कुमार (१४) यांनी अपयशी झुंज दिली.
राष्ट्रीय बास्केटबॉल : महाराष्ट्राच्या महिलांनी यूपीला नमविले, पाचव्या-सहाव्या स्थानासाठी तमिळनाडूविरुद्ध भिडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:26 AM