बीजिंग : स्पेनने रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाला ९५-७५ असे पराभूत करीत बास्केटबॉलचा विश्वचषक आपल्या नावे केला.संपूर्ण सामन्यात स्पेनने आघाडी कायम ठेवली. स्पेनने दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय जेतेपद पटकाविले. तीनवेळचा आॅल स्टार खेळाडू मार्क गेसोल एकाच वर्षी एनबीए व विश्वचषक जिंकणारा दुसरा खेळाडू बनला. मार्कचा २००६ मधील विश्वविजेत्या स्पेनच्या संघात समावेश होता. त्यावेळी त्याचा भाऊ पाऊ याचाही संघात समावेश होता. मात्र, दुखापतीमुळे तो खेळू शकलानव्हता. गेसोलने टोरंटो रॅपटर्ससह यावर्षी एनबीएचे विजेतेपद पटकाविले होते. गेसोलने अंतिम सामन्यात १४ गुण मिळविले. (वृत्तसंस्था)
बास्केटबॉलचा विश्वकप स्पेनकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 04:25 IST