(Image Credit : skindeepsalonspa.com)
अनेक महिला चेहरा, केस आणि त्वचेचं सौंदर्य जपण्यासाठी भरमसाठ पैसा खर्च करतात. पण नखांची काळजी घेण्याकडे दुर्लक्ष करतात. सुंदर आणि मजबूत नखे आपल्या चांगल्या निरोगी आरोग्याची ओळख असतात. नखे तुटण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. ही नखे तुटू नयेत म्हणून आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.
१) नखे तुटण्याचं एक मुख्य कारण म्हणजे आहारातून योग्य पोषक तत्वांची पदार्थ न खाणे. केसांची काळजी घेण्यासाठी ज्याप्रमाणे पोषक तत्वांची गरज असते, तशीच गरज नखांनाही असते. आहारात वेगवेगळ्या व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची गरज असायला हवेत. तसेच आयर्न, कॅल्शिअम आणि व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळेही नखे तुटतात.
२) जर तुमची नखे लवकर तुटत असतील आणि जास्त नाजूक असतील, तर व्हिटॅमिन बी, खासकरून बी ५ आणि फ्लॅक्सीड ऑइलचा वापर करा.
३) तुमची नखे जर लवकर तुटत असतील तर तुम्ही खोबऱ्याच्या तेलाने किंवा ऑलिव्ह ऑइलने नखांची मसाज करावी.
४) जर नखे निर्जिव झाली असतील तर दुधाचं सेवन करा. दुधाने हाडे आणि नखे मजबूत होतात.
५) रात्री झोपण्याआधी अॅंटी-फंगल नेल ड्रॉप्स लावा. याने फंलग इन्फेक्शनपासून बचाव होईल. म्हणजे नखे सुरक्षित राहतील.
६) नोकदार शूज, सॅंडल घालणे टाळावे कारणे याने पायाच्या अंगठ्यावर जोर पडतो आणि तेथील नख योग्यप्रकारे वाढू शकत नाही.
७) मेनीक्योर आणि पेडीक्यर करताना वापरल्या जाणाऱ्या वस्तू स्टरलाइज्ड आहेत की नाही हे चेक करा. शक्य असेल तर पार्लरमध्ये तुमची इन्स्ट्रूमेट किट घेऊन जा.
८) नखांना काही दिवसांसाठी नेल पॉलिश लावू नका. याने नखांवर पिवळे डागही पडू शकतात. एसीटोन फ्री नेल पॉलिश रिमूव्हरचा वापर करा. नेल पॉलिश काढल्यावर हातांना मॉइश्चरायजर क्रीम लावा.
९) वातावरणातील थंडाव्याचा परिणाम पाण्यावरही होतो. प्रत्येक वेळी गरम पाण्याने हात धुणं शक्य होत नाही. सतत थंड पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे नखांना नुकसान पोहोचते. आठवड्यातून एकदा नखांना गरम पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यामुळे त्यांचा कोरडेपणा दूर होण्यास मदत होते. त्यानंतर त्यावर खोबऱ्याचं तेल किंवा इतर कोणतंही ऑइल लावा.
(Image Credit : freeness.us)
१०) थंड पाण्यापासून नखांचं रक्षण करण्यासाठी हातांमध्ये ग्लव्सचा वापर करा. रबर ग्लव्स अगदी सहजपणे मार्केटमध्ये उपलब्ध होतात. त्यांच्या वापर करूनच भांडी किंवा कपडे धुवा. असं केल्यामुळे नखांचं थंड पाणी आणि साबणापासून रक्षण होऊ शकतं.