स्ट्रेट हेअरस्टाइलचा ट्रेन्ड अजूनही सुरु आहे. महिला आपले केस स्ट्रेट करण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करतात. पार्लरमध्ये केसांवर वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल्सचा वापर केला जातो. त्याने केस कमजोर होतात. जर तुम्हाला पैसे वाचण्यासोबतच केसांना अधिक मजबूत करायचं असेल तर तुम्ही घरीच केस स्ट्रेट करु शकता. चला जाणून घेऊ अशाच काही खास टिप्स...
१) फ्रूट पॅक
वेगवेगळी फळं केसांना पोषण देण्यासोबतच ते स्ट्रेट करण्यासही मदत करतात. स्ट्रॉबेरी यासाठी फार फायदेशीर आहे. काही स्ट्रॉबेरी आणि केळी एकत्र बारीक करा. त्यात दूध आणि मध टाकून पेस्ट तयार करा. आता हा फ्रूट पॅक केसांना लावून चांगल्याप्रकारे सुकू द्या. त्यानंतर केस धुवून घ्या. या फ्रूट पॅकच्या मदतीने केस हेल्दी, चमकदार आणि स्ट्रेट होतील.
२) मुलतानी माती
मुलतानी माती केवळ तुमच्या त्वचेसाठीच नाही तर केसांसाठीही फायदेशीर मानली जाते. मुलतानी मातीही केसांना स्ट्रेट करण्यासाठी मदत करते. यासाठी एका बाऊलमध्ये अंड्याचा पांढरा भाग, दोन चमचे तांदळाचं पिठ आणि एक कप मुलतानी माती मिश्रित करा. आता या मिश्रणामध्ये थोडं पाणी टाकून एका मुलायम पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट केसांना साधारण अर्धा तास लावून ठेवा. त्यानंतर केसांवर कंगवा फिरवून पुन्हा एकदा ही पेस्ट केसांना लावा. काही वेळा ही प्रक्रिया करा. त्यानंतर केस पाण्याने धुवा. त्यानंतर तुम्हाला झालेला फायदा दिसून येईल.
३) ऑयलिंग
(Image Credit : hair-oil.eu)
तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, ऑयलिंग करुनही केस मजबूत आणि स्ट्रेट करण्यास मदत होते. ऑयलिंगसाठी तुम्ही एक तेल वापरण्याऐवजी दोन-तीन तेल एकत्र करा. हे तेलाचं मिश्रण कोमट करा. हे तेल केसांना लावल्यावर डोक्यावर टॉवेल गुंडाळून ४५ मिनिटे तसाच ठेवा. त्यानंतर केस धुवून घ्या. काही दिवस हा उपाय केल्यास केस चमकदार, मजबूत आणि स्ट्रेट झालेले दिसतील.